आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिफेंडर किम योंग गॉन (२७ वा मि.) आणि फाॅरवर्ड चानने (९०+१ वा मि.) सर्वाेत्तम खेळीतून दक्षिण काेरिया संघाला फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीचा पल्ला गाठून दिला. या आशियाई फुटबाॅल संघाने शुक्रवारी राेनाल्डाेच्या पाेर्तुगाल संघाविरुद्ध चमत्कारिक विजय संपादन केला. काेरिया संघाने २-१ ने राेमहर्षक विजयाची नाेेंद केली. दुसरीकडे घानाविरुद्ध २-० अशा एकतर्फी विजयानंतरही लुईस सुआरेझच्या उरुग्वे संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
उरुग्वे संघाचे पॅकअप; सुआरेझसह खेळाडूंना राेखता आले नाही अश्रू मिडफील्डर जियाेर्जियनने (२६, ३२ वा मि.) गाेलचा डबल धमाका उडवत उरुग्वे संघाला शुक्रवारी घानाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून दिला. मात्र, या विजयानंतरही लुईस सुआरेझच्या उरुग्वे संघाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवता आले नाही. गाेलच्या पिछाडीने संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यादरम्यान कर्णधार सुआरेझ आणि इतर खेळाडूंना आपले अश्रू राेखता आले नाही. विजयानंतरही उरुग्वे संघ आपले आव्हान कायम ठेवण्यात अपयशी ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.