आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीडच्या लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळेने शनिवारी ३० वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याने ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये विक्रमाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. ऑलिम्पियन धावपटू अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे आयोजित साउंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये १२ वे स्थान गाठले. त्याने निश्चित अंतर १३.२५.६५ सेकंदात गाठले.
यासह त्याने आपल्याच देशाच्या बहादूर प्रसाद यांचा विक्रम ब्रेक केला. प्रसाद यांनी १९९२ मध्ये बर्मिंगहॅम येथील स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्यांनी १३ मिनिटे २९.७० सेकंदांत अंतर गाठले होते.
बीड जिल्ह्यातील मांडवा गावच्या धावपटू अविनाशला आता या मीटमध्ये १२ व्या स्थानी धडक मारता आली. या गटामध्ये टाेकियो ऑलिम्पिकमधील १५०० मीटरच्या चॅम्पियन जॅकब इंजब्रिस्टनने सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्याने १३ मिनिट २.०३ सेकंदात निश्चित अंतर गाठले.
ऑलिम्पियन अविनाशने गतवर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही सर्वोत्तम वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली होती. दोहा येथील २०१९ एशियन चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेत्या या धावपटूने ऑलिम्पिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये हा विक्रम नोंदवला होता. त्याने भारतीय अॅथलेटिक्समधील दीर्घ कालावधीचा राष्ट्रीय विक्रम ब्रेक केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.