आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Before The Asia Cup, The Final Match Between Pakistan And Sri Lanka Today, Pakistan's First Batting Match

पाकिस्तान Vs श्रीलंका:श्रीलंकेचा पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय; पाथुम निसंकाची धमाकेदार फलंदाजी ठोकल्या 55 धावा

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकातील सुपर 4 मधील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना श्रीलंकेने 5 गडी राखून जिंकला. सामना खेळणारे दोन्ही संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने 19.1 षटकांत 121/10 धावा केल्या. त्यांचा संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानी संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 122 धावांचे आव्हान ठेवले. धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या 17 षटकात 124/5 धावा करून सामना जिंकला. पाथुम निसंकाने धमाकेदार फलंदाजी करीत 48 चेंडूत नाबाद 55 धावा ठोकल्या. श्रीलंकेचे कुसल मेंडिस, दनुष्का गुणातिलाका, धनंजय डी सिल्वा हे श्रीलंकेचे तीन फलंदाज लवकर तंबूत परतले.

पाकिस्तानी संघाचे सलामीवीर आणि त्यानंतर इफ्तिखार अहमद, कर्णधार बाबरही झटपट बाद झाले. श्रीलंकेच्या फिरकीपटूने पाकिस्तानी फलंदाजांना बांधून ठेवले आणि धावांचा वेग रोखला. 10व्या षटकात पाकिस्तानची दुसरी विकेट गेली. करुणारत्नेने फखरला 13 धावांवर बाद केले. त्यानंतर ठाराविक अंतराने पाकिस्तानचे फलंदाज बाद होत गेले.

सलामीवीर मोहम्मद रिझवानने सामन्याच्या चौथ्या षटकात आपली विकेट गमावली. प्रमोद मधुशंकाने श्रीलंकेला सामन्यातील पहिली विकेट मिळवून दिली. त्याने रिझवानला बाद केले.

रिजवान 14 धावा करून बाद झाला. प्रमोद मधुशंकाला पहिली विकेट मिळाली.
रिजवान 14 धावा करून बाद झाला. प्रमोद मधुशंकाला पहिली विकेट मिळाली.

कर्णधार बाबर आझमचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. पाकिस्तानने संघात दोन बदल केले आहेत. आज शादाब खान आणि नसीम शाह यांच्या जागी हसन अली आणि उस्मान कादिर खेळताना दिसणार आहेत.

त्याचबरोबर धनंजय डी सिल्वा आणि प्रमोद मधुसूदन यांचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे.

प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, उस्मान कादिर, हसन अली, हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैन.

श्रीलंका: कुशल मेंडिस, पथुम निसांका, धनंजया डी सिल्वा, दानुष्का गुनाथिलिका, दासुन शनाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, महिश तेक्षाना, प्रमोद मधुसूदन आणि दिलशान मधुशंका.

श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर-4 चा शेवटचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत, त्यामुळे या सामन्याला प्री-फायनल सुद्धा म्हटले जात आहे. या सामन्यातील पराभव किंवा विजयाने दोन्ही संघांच्या स्थितीत फरक पडणार नाही. सुपर-4 मध्ये, दोन्ही संघांनी सुपर-4 मध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ अजिंक्य आहेत. या फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

यानंतर त्याने अफगाणिस्तानवर विजय मिळवला. त्याचवेळी श्रीलंकेने आधी अफगाणिस्तान आणि नंतर भारताचा पराभव केला. प्रत्येकी दोन पराभवांसह भारत आणि अफगाणिस्तानचे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

बाबर आझम आशिया कपमध्ये फ्लॉप ठरत आहे.
बाबर आझम आशिया कपमध्ये फ्लॉप ठरत आहे.

सामोरा समोर

पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी एकमेकांविरुद्ध टी-20 मध्ये एकूण 21 सामने खेळले आहेत. T20 मध्ये पाकिस्तानचा वरचष्मा आहे. एकूण 21 सामन्यांमध्ये पाकिस्तानने 13 सामने जिंकले, तर श्रीलंकेने केवळ 8 सामने जिंकले. आज दोन्ही संघ आत्मविश्वासाने सामन्यात उतरतील.

बातम्या आणखी आहेत...