आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Being Under Contract, Japan Cannot Cancel The Olympics; Possibility Of Impact On The Country's Credibility: Experts

ऑलिम्पिक:करारबद्ध असल्याने जपान ऑलिम्पिक रद्द करू शकत नाही; देशाच्या विश्वासार्हतेवर परिणामाची शक्यता : तज्ज्ञ

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेविरोधात नागरिक आंदाेलन करत आहेत. - Divya Marathi
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेविरोधात नागरिक आंदाेलन करत आहेत.
  • जपानची 70 टक्के जनता ऑलिम्पिक स्पर्धेच्या विरोधात असून आंदोलन करत आहे, मात्र आयओसी आयोजनावर ठाम

कोरोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जपानमध्ये कोरोना वाढत असल्याने राजधानी टोकियो आणि तीन प्रमुख शहरांत कठोर निर्बंध वाढवले. जपानची ७० टक्के जनता ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयआेसी) स्पर्धा आयोजनावर ठाम आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा प्रथम जनतेच्या बाजूने झुकताना दिसले. त्यांनी म्हटले की, सरकारचे ऑलिम्पिकला प्राधान्य देणार नाही. मात्र, अंतिम निर्णय आयसीसी घेईल. जपान स्पर्धा रद्द करण्याबाबत का बोलत नाही? ऑलिम्पिक रद्द करण्याचा हक्क कोणाला? स्पर्धा रद्द होऊ शकते का? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे...

स्पर्धा जपानच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक
ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यास जपानला मोठा आर्थिक फटका बसेल. त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पुढील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा २०२२ मध्ये आहे. ही स्पर्धा जपानचा प्रतिस्पर्धी देश चीनमध्ये होत आहे. प्रा. अँडरसन म्हणाले,‘स्पर्धा आयोजन करण्यास स्पर्धा काही करू शकतो, यात शंका नाही. गतवेळी जपानने १९६४ मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवले होते. तेव्हा स्पर्धेला दुसऱ्या महायुद्धादरम्यान देशाच्या पुनरुज्जीवन व उभारणीच्या प्रक्रियेशी जोडण्यात आले होते. जपानमध्ये दीर्घ काळापासून आर्थिक संकट आहे. टोकियो स्पर्धेला सुनामी व न्युक्लिअर आपत्तीतून बाहेर पडत असलेल्या जपानच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.’

अप्रत्यक्ष खर्चाचा विमा नाही, मोठे आर्थिक नुकसान होईल

मेलबर्न विद्यापीठाचे प्रा. जॅक अँडरसन नुसार, जपानने एकतर्फी करार संपुष्टात आणल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. जपान व आयओसीच्या ब्रॉडकास्टिंग प्रायोजकात अरबो रुपयांची भागीदारी आहे. अँडरसन यांनी म्हटले की, ‘आयओसीकडे विमा आहे, स्थानिक आयोजन समितीकडे विमा आहे, अनेक ब्रॉडकास्टर व प्रायोजकांकडे विमा आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास, मोठ्या प्रमाणात विमा द्यावा लागेल.’ आयोजकांना स्पर्धा रद्द झाल्यास जवळपास ३५०० कोटी रुपये विमा मिळेल. इंश्युरन्स आयोजनाचा प्रमुख खर्च भरून काढेल. मात्र, अप्रत्यक्ष खर्चाचे नुकसान होईल. जसे हॉटेल्स आदींचा खर्च किंवा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डागडुजी व दुरुस्ती केल्याचा खर्च आदी. त्याचबरोबर, देशातील आदरातिथ्य क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, स्थानिक गोष्टींचे देखील नुकसान होईल. यापूर्वीच स्पर्धा स्थगित झाल्याने ४२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या साधन, सुविधांच्या देखभालीचा खर्च वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना करू शकते स्पर्धा रद्द
आयओसी व यजमान शहर यांच्यात थेट करार आहे. या करारांतर्गत केवळ आयओसी ऑलिम्पिक रद्द करू शकते, यजमान शहर नाही. आंतरराष्ट्रीय क्रीडा वकील अॅलेक्सझंड्रे मिगुएल मेस्त्रे यांच्या नुसार, याचे मुख्य कारण म्हणजे, ऑलिम्पिक स्पर्धा आयओसीची संपदा ‘एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टी’ आहे. स्पर्धेचे मालक म्हणून आयओसी हा करार रद्द करू शकतो. युद्ध किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्या परिस्थितीत आयओसीला वाटले की, खेळाडूंना धोका आहे, तेव्हा स्पर्धा रद्द करू शकते. सध्या महामारीकडे धोका म्हणून पाहिले जाऊ शकते. मेस्त्रे यांनी म्हटले, ‘आयआेसी खेळाडूंचे आरोग्य लक्ष्यात घेता, सुरक्षित खेळ आयोजित करू शकतो, असे ऑलिम्पिक करारात म्हटले आहे. त्याशिवाय ही स्पर्धा रद्द केली जाऊ शकत नाही.’

स्पर्धा आयोजित करावी की नाही ?
हा प्रश्न वेगळा आहे की, स्पर्धा होणार आहे की नाही? आतापर्यंत केवळ तीन वेळा (१९१६, १९४०, १९४४) मध्ये स्पर्धा रद्द झाली आहे. तिन्ही वेळा जागतिक महायुद्धादरम्यान. त्यामुळे वाद वाढत असतानाही अनेक निरीक्षकांना वाटते की, यंदा ऑलिम्पिक २३ जुलै रोजी सुरू होईल. मात्र, कुठल्या प्रकारे व स्वरूपात हे अद्याप स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...