आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bengal Sports Minister Manoj Tiwary's Second Consecutive Century Against Madhya Pradesh

रणजी ट्रॉफी:मध्य प्रदेशविरुद्ध बंगालच्या क्रीडामंत्री मनोज तिवारीचे सलग दुसरे शतक

अल्लूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगाल संघाकडून खेळताना क्रीडामंत्री मनोज तिवारीने (१०२) गुरुवारी रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश टीमविरुद्ध उपांत्य सामन्यात शतकी खेळी केली. यासह त्याने सलग दुसऱ्या शतकाची नोंद आपल्या नावे केली. मात्र, टीमची २७३ धावांत दाणादाण उडाली. यातून मध्य प्रदेश संघाला पहिल्या डावात ६८ धावांची आघाडी मिळाली. मध्य प्रदेश संघाने दुसऱ्या डावात २ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा काढल्या. यासह मध्य प्रदेश संघाने एकूण २३१ धावांची आघाडी घेतली. आता मध्य प्रदेश संघाचा आदित्य (३४) आणि रजत पाटीदार (६३) मैदानावर कायम आहेत. मध्य प्रदेश संघाचे गोलंदाज कुमार कार्तिकेय, सारांश जैन आणि पुनीतने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्यामुळे बंगाल टीमला झटपट आपला पहिला डाव गुंडाळावा लागला.

पृथ्वीचे अर्धशतक; मुंबईची आघाडी
मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शाॅने आता दमदार पुनरागमन केले. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या याच सलामीवीर फलंदाजाने आता दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशविरुद्ध शानदार ५४ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबई संघाला दिवसअख‌ेर दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात १३३ धावा काढता आल्या. यासह मुंबईने आता २१३ धावांची आघाडी घेतली. मुंबई संघाचा यशस्वी जायस्वाल (३५) आणि अरमान (४२) मैदानावर कायम आहेत. उत्तर प्रदेश टीमचा पहिल्या डावात अवघ्या १८० धावांत खुर्दा उडाला.

बातम्या आणखी आहेत...