आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Bengaluru Have A Chance To Win A Hat trick Against Lucknow Today, Broadcast Evening. 7.30 Hrs.

लखनऊ संघ तिसऱ्या विजयासाठी उत्सुक:लखनऊविरुद्ध बंगळुरूला आज विजयी हॅट््ट्रिकची संधी , प्रक्षेपण सायं. 7.30 वा.

गळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाख‌ाली राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स टीमविरुद्ध विजयी हॅट््ट्रिक करण्याची संधी आहे. यासाठी बंगळुरू संघाने आपल्या घरच्या मैदानावर कंबर कसली आहे. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपरजायंट्स संघांमध्ये साेमवारी सामना रंगणार आहे. बंगळुरू संघ आता लीगमध्ये दुसऱ्या विजयासाठी उत्सुक आहे. तसेच लाेकेश राहुलच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेला लखनऊ संघ यंदाच्या लीगमध्ये आपला तिसरा विजय साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हे दाेन्ही संघ पहिल्यांदाच समाेरासमाेर येणार आहेत. यापूर्वी या मैदानावर बंगळुरू आणि लखनऊ संघात एकही सामना झाला नाही. याच मैदानावर बाजी मारून यजमान बंगळुरू संघ आता विजयी ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण, बंगळुरू संघाला गत सामन्यात यजमान काेलकाता संघाकडून ईडन गार्डनवर पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे बंगळुरू संघ आता विजय संपादन करत गुणतालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. गत सामन्यातील विजयाने लखनऊ संघ सध्या फाॅर्मात आहे. यामुळे आता टीमच्या नावे दाेन विजयाची नाेंद झालेली आहे. आता टीम तिसरा विजय आपल्या नावे करू शकेल. यामुळे संघाला पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठता येणार आहे.