आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करािरअल माद्रिदने प्रतिष्ठेच्या अल क्लासिकाेमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी बार्सिलाेनाला धूळ चारली. फाॅर्मात असलेल्या करीम बेझेंमाने (५०, ५८, ८० वा मि.) गाेलची हॅटट्रिक करत काेपा डेल रेमध्ये माद्रिदचा विजय साजरा केला. यातून माद्रिद क्लबने बुधवारी ४-० ने अल क्लासिकाेमध्ये विजय संपादन केला. क्लबच्या विजयात विनिसियसने (४५+१ वा मि.)एका गाेलचे याेगदान दिले. यासह माद्रिदने आता किताबाचा आपला दावा मजबूत केला. आता माद्रिदने उपांत्य फेरीचा दुसरा लेग सामना ४-० ने जिंकला. बार्सिलाेनाने पहिला लेग १-० ने जिंकला हाेता. माद्रिदला एकूण ४-१ च्या स्काेअरने फायनलचा पल्ला गाठला. आता किताबासाठी माद्रिद क्लबचा अंतिम सामना आेसासुनाशी हाेणार आहे. हे दाेन्ही संघ ६ मे राेजी फायनलमध्ये समाेरासमाेर असतील. दुसरीकडे आेसासुना क्लबनेही उपांत्य फेरीत दणदणीत विजय संपादन करत फायनल गाठली आहे. ओसासुनाने अॅथलेटिक क्लबचा पराभव केला. माद्रिदच्या करीम बेंझेमाने चार दिवसांत आपली दुसरी हॅटट्रिक साजरी केली. तसेच माद्रिदने अल क्लासिकाेमध्ये १०२ वा विजय साजरा केला.
बेंजेमा टॉप-5 मध्ये फुटबाॅलपटूगोल मेसी474 रोनाल्डो311 तेल्मो जारा254 ह्यूगो सांचेज234 बेंझेेमा233
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.