आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ:भक्ती, तनय, ओमला विजेतेपद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने जीनियस चेस अकादमीतर्फे आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भक्ती गवळी, तनय कव्हाळे आणि ओम चव्हाण यांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. सिल्लोड येथे झालेल्या स्पर्धेत एकूण ९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून होली फेथ इंग्लिश स्कूल, भराडी यांना ट्रॉफी देऊन गौरवले. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी पंडित समिंद्रे, अलका राजपूत, माजी सैनिक प्रेमसिंग राजपूत, सांडू वाणी, रवी सुरसे, हेमेंद्र पटेल आणि, शिवकुमार वाघ यांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वितेसाठी आयोजक मयुरेश समिंद्रे, पंच दिनेश क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.

विजेते खेळाडू : ८ वर्षे गट - भक्ती गवळी, युवराज चारवंडे, अथर्व शेळके, सोहम कौरवार, आयुष शेळके. १४ वर्षे गट - तनय कव्हाळ, यश क्षीरसागर, अर्णव सोनावणे, आदित्य फुसे, गौरव राजपूत. खुला गट - ओम चव्हाण, निखिल चौथमल, गोपाळ चरावंडे, मधुकर बिलगे, दिनेश क्षीरसागर.

बातम्या आणखी आहेत...