आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड:भूषण नावंदेची सराव शिबिरासाठी निवड

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या संभाव्य संघात औरंगाबादचा युवा फलंदाज भूषण नावंदेची निवड करण्यात आली आहे. पुणे येथील आंतरराष्ट्रीय एमसीए क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सराव सामने चालू आहेत. या शिबिरामध्ये भूषण नावंदेदेखील सहभागी झाला आहे. शिबिरानंतर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर केला जाईल. भूषणने जुलै महिन्यात लंडन येथे क्लब काउंटिंग क्रिकेट खेळला आहे. त्याने स्पार्टन क्लबकडून खेळताना ७५ चेंडूंत ८१ धावांची शानदार खेळी केली होती. भूषण व्हिजन क्रिकेट अकादमीचा खेळाडू आहे. त्यांच्या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे अभिनंदन केले. तो ज्येष्ठ फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा मुलगा आहे.