आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमवारी:आयसीसी क्रमवारीतकोहलीची मोठी झेप, अश्विन अव्वलस्थानी कायम

दुबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने आयसीसी क्रमवारीत त्यांना फायदा होताना दिसतोय. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली सात स्थानांनी झेप घेत १३ व्या क्रमांकावर पोहोचला. चौथ्या कसोटीपूर्वी तो क्रमवारीत २० व्या स्थानी होता. त्याचबरोबर, आर. अश्विन नव्या क्रमवारीत कसोटीमध्ये एकमेव नंबर वन गाेलंदाज बनला. तो इंग्लंडचा जेम्स अँडरसनसोबत संयुक्त अव्वलस्थानी आहे. अश्विनने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत २५ बळी घेतले होते आणि मालिकावीरही राहिला. भारतीय अष्टपैलू अक्षर पटेललाही अष्टपैलू क्रमवारीत फायदा झाला.

बातम्या आणखी आहेत...