आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Black Caddy's Struggle Journey Now On Stage; Since 1934, The Role Has Been Remarkable

दिव्य मराठी विशेष:कृष्णवर्णीय कॅडींचा संघर्षमय प्रवास आता रंगमंचावर ; 1934 पासून भूमिका लक्षवेधी

अगस्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेत्तम कामगिरीतून जागतिक स्तरावर गाेल्फपटूंनी आपली छाप पाडली आहे. मात्र, या सर्व यशामागे महत्त्वाचे याेगदान कॅडीचे आहेत. त्यांच्या पाठबळामुळेच गाेल्फपटूंना माेठे यश संपादन करता आले. त्यामुळेे या सर्व वर्ल्ड चॅम्पियन गाेल्फपटूंच्या यशात कॅडीचाही माेलाचा वाटा मानला जाताे. त्यामुळे साेनेरी यशाचे श्रेय हे गाेल्फपटू आणि कॅडी या दाेघांनाही जाते. कॅडीची भूमिका ही गाेल्फपटूसाठी महत्त्वाची मानली जाते. ताे बॅग सांभाळण्यापासून गाेल्फपटूला काेर्सवरील परिस्थितीचा अंदाज सांगण्यापर्यंतच्या सर्व भूमिका यशस्वीरीत्या बजावताे. याशिवाय या परिस्थितीदरम्यान काेणत्या गाेल्फ स्टिकचा वापर अधिक महत्त्वपूर्ण ठरेल, याचेही मार्गदर्शन कॅडी करत असताे. त्यामुळे कॅडीला स्पर्धेतील दर्जेदार कामगिरीबाबत गाेल्फ काेर्सवरील सर्व माहिती असते. यामुळे कॅडी हा परिपूर्ण मानला जाताे. यामुळेच अनेक कॅडींनी पुढाकार घेत गाेल्फपटूच्या भूमिकेत पदार्पण केले. आपल्या दर्जेदार खेळीच्या बळावर त्यांनी अनेक किताबाचा बहुमानही पटकावला. याच कॅडीचा संघर्षमय प्रवास रंगमंचावर नाटकाच्या रुपात उलगडला जाणार आहे.

कृष्णवर्णीय कॅडींची कामगिरी लक्षवेधी : १९३४ पासून अगस्ता मास्टर्स गाेल्फ स्पर्धेच्या आयाेजनाला सुरुवात करण्यात आली. यादरम्यान सुरुवातीला सहायकाच्या भूमिकेत अनेक कामगार हाेेते. यामध्ये सर्वाधिक संख्येत कृष्णवर्णीयच हाेते. पुढे त्यांना कॅडीची भूमिका बजावण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्यांनी गाेल्फ काेर्सवर काम करणाऱ्या मजुरांना पाणी देणे वा इतर कामे देण्याची भूमिका बजावत हाेते. मात्र, त्यानंतर ते कॅडी म्हणून गाेल्फपटूंसाेबत राहू लागले. सँड हिल्स परिसरातील सर्वाधिक कॅडी हे अगस्ता मास्टर्समध्ये सहभागी हाेत असत.

१९८३ च्या नियमाने बसला फटका : अगस्ता मास्टर्स गाेल्फ स्पर्धेदरम्यान कॅडी हे प्रचंड मेहनतीतून काम करत हाेते. मात्र, १९८३ मध्ये अचानक या स्पर्धेदऱ्यान नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे गाेल्फपटूंना आपलाच कॅडी स्पधॅेदरम्यान साेबत घेऊन जाता येऊ शकताे, असा नियम करण्यात आला. यामुळे अनेक कॅडीचा राेजगार हिरावला गेला. अनेकांना ही नाेकरीच साेडून द्यावी लागली.