आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात असलेला घाना फुटबाॅल संघ आता फिफा विश्वचषकामध्ये दुसऱ्या दणदणीत विजयासाठी उत्सुक आहे. यादरम्यान घानाचा गटातील तिसरा सामना शुक्रवारी लुईस सुआरेझच्या उरुग्वे संघाविरुद्ध हाेणार आहे. या सामन्यामध्ये सध्या घाना संघाच्या विजयाचे पारडे जड मानले जाते. या संघाने गत सामन्यात दक्षिण काेरियाला धूळ चारली. यासह घाना संघाला एच गटामध्ये दुसऱ्या स्थानी धडक मारता आली.
आता घाना संघाने २०१० विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील पराभवाची परतफेड उरुग्वे टीमला करून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आता उरुग्वे संघाला विजयासाठी माेठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. सध्या हा संघ सुमार खेळीमुळे अडचणीत सापडला आहे. कारण, या संघाने आतापर्यंत सामन्यात एकही गाेल केला नाही. संघाचे फाॅरवर्ड आणि स्ट्रायकर सातत्याने अपयशी ठरत आहेत. यामुळेच या संघाला अपयशाचा सामना करावा लागत आहे. उरुग्वे संघाचा स्ट्रायकर सुआरेझही सध्या सपशेल फ्लाॅप ठरत आहे. यामुळेच संघ पराभवाच्या गर्तेत सापडला आहे.
आंतरराष्ट्रीय सामने; आतापर्यंत १ २०२० फिफा विश्वचषकात दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त एकदाच आमने-सामने आले आहेत. हा उपांत्यपूर्व सामना होता. या घानाला शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
प्लेयर्स टू वाॅच {घानाचा कुडूस सध्या सर्वाेत्तम खेळीमुळे चर्चेत आहे. त्याने गत सामन्यात २ गाेल केले. ताे एका सामन्यात दाेन गाेल करणारा घानाचा एकमेव फुटबाॅलपटू ठरला.
{ उरुग्वे संघाचा मिडफील्डर फेडेरिकाे वाल्वरेड सध्या चांगली खेळी करत आहे. त्यामुळे संघाला विजयी ट्रॅकवर आणण्याची मदार त्याच्यावर असेल.
उरुग्वे कोच vs घाना कोच { उरुग्वेचे प्रशिक्षक दिएगो अलोन्सो यांच्यासाठी हा सामना आव्हानात्मक असेल. यात तो आक्रमक खेळ करेल. कारण या सामन्यात त्यांचा पराभव झाला.
{ घानाचे प्रशिक्षक ओट्टो एडो यांनी सामना सकारात्मक पद्धतीने खेळवण्याचे सांगितले आहे. प्रशिक्षक कुडूस या स्टार खेळाडूवर विश्वास ठेवतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.