आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Bogus Certificate Racket Runs From Aurangabad, Case Settled In Two Months, 4 Thousand 789 Page Report; The Hearing Begins

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाची फसवणूक:औरंगाबादेतून चालते बोगस प्रमाणपत्राचे रॅकेट, तलवारबाजीत सहा बाेगस प्रमाणपत्रे; दोन महिन्यात प्रकरणाचा छडा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तलवारबाजीत सहा बाेगस प्रमाणपत्रे; संघटनेचे मौन
  • 4 हजार 789 पानांचा अहवाल; सुनावणी सुरू

राज्यभर व्याप्ती असलेल्या बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या रॅकेटमधून अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. तलवारबाजी खेळ प्रकारातील बाेगस प्रमाणपत्राबाबत धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. यादरम्यान आठ वर्षे ११ महिन्यांचा असणारा खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे चाैकशी अधिकाऱ्यांनी दाेषाराेपपत्र सादर केले आहे.

राज्यामध्ये बाेगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा मलीदा लाटण्याचा प्रकार करण्यात आला. यासाठी खास करून औरंगाबाद विभागातून ही प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. त्यामुळे ट्रम्पाेलियन खेळाची ही प्रमाणपत्रे देणारे रॅकेट औरंगाबादमध्येच सक्रीय असल्याचे समाेर आले.

नागपुरात पाेलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने लाटली शासकीय नाेकरी : नागपुूर विभागात राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेता असल्याचे दाखवून नागपूरच्या एका पाेलिस अधिकाऱ्याने मुलासाठी बाेगस प्रमाणपत्र मिळवले. त्या आधारे त्याला शासकीय सेवेत लावले. मात्र, आता चाैकशीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या विभागात २१ बाेगस प्रमाणपत्र धारक असल्याचे समाेर आले आहे.

तलवारबाजीत सहा बाेगस प्रमाणपत्रे; संघटनेचे मौन :

तलवारबाजी खेळ प्रकारातील पदक जिंकल्याची बाेगस प्रमाणपत्रेही शासकीय सेवेसाठी जाेडल्याचे उघड झाले आहेत. यामध्ये सहा खेळाडूंचा समावेश आहे. या संबंधीत क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या चाैकशीत समाेर आले. मात्र, या प्रमाणपत्राबाबत राज्य आणि राष्ट्रीय संघटनेने चुप्पी साधली. यावर त्यांनी काेणतीही प्रतिक्रीया दिली नाही.

शासकीय सेवेत कार्यरताकडून शासनाची झाली फसवणूक : शासनाच्या महसुल, कृषी, पाेलीस, मंत्रालय व इतर काही सेवेमध्ये नाेकरी मिळवण्यासाठी बाेगस प्रमाणपत्राचा आधार घेतला. चाैकशीमध्ये ४० जण मागील ४ वर्षांपासून शासकीय सेवेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले. मंत्रालयात काही जण कार्यरत आहेत.

पठानियांची कसून चाैकशी :

राजेंद्र पठानिया यांनी ट्रम्पाेलियन खेळाची संघटना स्थापन केली हाेती. मात्र, २००५ नंतर संघटना बंद झाली. मात्र, आपली खाेटी स्वाक्षरी वापरून ही प्रमाणपत्रे वाटप केल्याची माहिती दिल्लीवरुन चाैकशीसाठी बोलवलेल्या पठानिया यांनी दिली.

पात्र खेळाडूंना मिळणार लाभ

राज्यातील पात्र व प्रत्यक्षात पदक जिंकलेल्या खेळाडूंना आता शासकीय सेवेेचा लाभ मिळेल. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाने कसून चाैकशी केली आहे. दाेषी खेळाडंूनी लाटलेल्या नोकरीत पात्र खेळाडूंची निवड करण्याचा मानस क्रीडा आयुक्तांनी व्यक्त केला.