आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉर्डर-गावसकर चषक:भारताचा लौकिक संकटात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘कसोटी’, जिंकल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

अहमदाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉर्डर-गावसकर चषकातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना उद्यापासून (९ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर सुरू होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर हा सामना जिंकणे अतिशय गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आकड्यांचा विचार केल्यास घरच्या मैदानावर भारताची कामगिरी उत्तम आहे.

फेब्रुवारी २०१३ नंतर भारताने घरच्या मैदानावर सलग १५ मालिका जिंकल्या आहेत. मात्र सध्या हा लौकिक संकटात सापडला आहे. भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. मात्र इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची कामगिरी पाहता भारताला सावध व्हावे लागेल. पाहुण्यांचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे भारत हा सामना जिंकून विजयी अभियान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

ऑस्ट्रेलियन संघ अहमदाबादेत प्रथमच कसोटी सामना खेळेल. मैदानाच्या पुनर्निमितीनंतरचा विचार केल्यास भारताने येथे दोन कसोटी सामने खेळले आहेत. ते दोन्ही जिंकले. फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडला १० गड्यांनी आणि मार्चमध्ये एक डाव आणि २५ धावांनी मात दिली. भारताने मंगळवारी जोरदार सराव केला. कर्णधार रोहित शर्मा आणि कोहलीने भरपूर घाम गाळला. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी पाहता केएस भरतच्या जागी ईशान किशनला संधी मिळू शकते. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी नेट््समध्ये इशानचा वेगळा सराव करून घेतला. या सरावात भरतला विश्रांती देण्यात आली. तो बुधवारी सराव करेल. दरम्यान, अखेरच्या कसोटी सामन्यासाठी लाल आणि काळ्या मातीच्या दोन खेळपट्ट्या तयार केल्या आहेत.

सिराजच्या जागी अनुभवी शमीला मिळू शकते संधी या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. एनसीएच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार संघ व्यवस्थापन सिराजला आगामी एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त ठेवू इच्छिते. त्यामुळे त्याला आराम दिला जाईल. दुसरीकडे इंदूर कसोटीत अपयशी ठरूनही शुभमन गिलवर प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहितचा विश्वास कायम आहे. केएल राहुलला स्थान मिळणार नाही. मध्यक्रमात सूर्यकुमारला संधी मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...