आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉर्डर-गावसकर चषक:इंदूर कसाेटीची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची : आयसीसी

इंदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल क्रिकेट काैन्सिलने (आयसीसी) इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगितले. येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेलेला बॉर्डर-गावसकर चषक मालिकेचा तिसरा कसोटी सामन्याचा निकाल दोन दिवस आणि एका सत्रात लागला.

आयसीसी मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्टेडियमला तीन डिमेरिट गुण दिले आहेत. बीसीसीआयला अपिलासाठी १४ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. आयसीसीच्या या निर्णयानंतर स्टेडियमवर बंदी येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...