आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Border Gavaskar Series | Spinners Take 13 Wickets, India Bowled Out For 109 Runs, Kuhneman Takes 5 Wickets

बॉर्डर-गावसकर मालिका:फिरकीपटूंनी घेतले 13 बळी , भारत 109 धावांवर ढेपाळला, कुहनेमनचे 5 बळी

इंदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • होळकर मैदानावर पहिल्या दिवशी फिरकीपटूंचे वर्चस्व

बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसऱ्या कसोटीला बुधवारी इंदूरमध्ये सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी १४ पैकी १३ बळी फिरकीपटूंनी घेतले. हा दिवस पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघासाठी चालू दौऱ्यातील सर्वात चांगला दिवस ठरला. त्यांनी यजमान भारतीय संघाला पहिल्या दोन सत्रात अवघ्या १०९ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद १५६ धावा काढल्या. संघाने ४७ धावांची आघाडी घेतली. दिवसाच्या शेवटी पीटर हँड्सकोम्ब ७* व कॅमरून ग्रीन ६* मैदानावर टिकून आहेत. उस्मान ख्वाजाने (६०) कठीण खेळपट्टीवर शानदार अर्धशतक झळकावले. चारही बळी फिरकीपटू रवींद्र जडेजाने घेतले.

४४ धावांत भारताचे अर्धे फलंदाज तंबूत परतले यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीचे दोन दिवस फलंदाजांसाठी चांगल्या मानल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंसमोर नांग्या टाकल्या. २७ धावांच्या सलामीनंतर गडी बाद होण्याची सुरुवात झाली. रोहित शर्मा (१२), शुभमन गिल (२१), चेतेश्वर पुजारा (१) धावा करून परतला. विराट कोहलीने सर्वाधिक २२ धावा काढल्या.

उमेश यादव कसोटी षटकारात युवराज - रवी शास्त्रींच्या पुढे { होळकर स्टेडियमवर वेगवान गोलंदाज उमेश यादवने १३ चेंडूंत १७ धावा करत संघाला शंभरी गाठून दिली. त्याने १ चौकार व २ षटकार खेचले. या दोन षटकारांसह त्याने युवराज सिंग व रवी शास्त्रीचा २२ षटकारांचा आकडा मागे टाकला. यादवचे कसोटीत ६४ डावांत २४ षटकार झाले. विराटचेदेखील १८१ डावांत २४ षटकार आहेत. { इंदूरची खेळपट्टी दिवसाच्या पहिल्या सत्रात फिरकीपटूंसाठी नंदनवन ठरली. त्यांनी फलंदाजांना खूप चकवले. नागपूरमध्ये फिरकीपटूंना पहिल्या सत्रात मिळालेला टर्न सरासरी २.५ डिग्री होता. इंदूरला तो दुप्पट टर्न म्हणजे सरासरी ४.८ डिग्री मिळाला. शक्यतो इतका टर्न सामन्याच्या चौथ्या-पाचव्या दिवशी मिळतो.

बातम्या आणखी आहेत...