आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफाॅर्मात आलेल्या माजी कर्णधार विराट काेहलीने (१८६) शानदार शतक साजरे करताना यजमान टीम इंडियाला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात धावांचा डाेंगर रचून दिला. त्याने १६ व्यांदा दीड शतकी भागीदारी रचली. यादरम्यान अक्षर पटेलनेही (७९) अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला अहमदाबाद कसाेटीच्या पहिल्या डावात ५७१ धावा काढता आल्या. यातून टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये ९१ धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलिया संघाने चाैथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद ३ धावा काढल्या आहेत. ८८ धावांनी पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची मॅथ्यू कुन्हेनमन (०) आणि ट्रेव्हिस हेड (३) ही सलामीची जाेडी मैदानावर कायम आहे. काेहलीने आपल्या विराट खेळीतून रविवारचा दिवस गाजवला. त्याने ३६४ चेंडूंचा सामना करताना १५ चाैकारांसह १८६ धावांची खेळी केली. यासह त्याने २०१९ नंतर शतक साजरे केले आहे.
काेहलीची ५५२ डावांत ७५ शतके; सचिनला टाकले मागे विराट काेहलीने रविवारी २८ वे कसाेटी शतक झळकावले. तसेच आता त्याच्या नावे ७५ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची नाेंद झाली आहे. त्याने ५५२ डावातून हा पल्ला गाठला. यासह त्याने सचिनच्या कामगिरीला मागे टाकले आहे. सचिनने ५५६ डावातून ७५ शतके साजरी केली आहेत. तसेच काेहलीने आता १६ व्यांदा १५०+ धावांची भागीदारी रचली. यासह त्याने या सर्वाधिक धावांच्या भागीदारीमध्ये दुसरे स्थान गाठले. सचिन हा सर्वाधिक २५ माेठ्या भागीदारीसह अव्वल स्थानी कायम आहे.
पाठीच्या दुखापतीने श्रेयस हाेणार वनडे मालिकेतून बाहेर चाैथ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापत झाली. या पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. याच दुखापतीमुळे आता ताे ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध हाेणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याची जागी या मालिकेसाठी श्रीकारला संधी देण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारपासून या मालिकेला सुरुवात हाेणार आहे.
6 वेळा ५०+ धावांच्या भागीदारीची भारताची नाेंद झाली. काेहलीने जडेजासाेबत (२८) चाैथ्या विकेटसाठी ६४, श्रीकारसाेबत (४४) पाचव्या विकेटसाठी ८४, अक्षरसाेबत (७९) सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी रचली. यापूर्वी राेहित-शुभमनने पहिल्या विकेटसाठी ७४, शुभमन-पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी ११३, काेहली-शुभमनने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.