आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरच्या मैदानावर आघाडीच्या फळीतील अनुभवी फलंदाज फ्लाॅप ठरल्याने यजमान टीम इंडियाच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेतील विजयी माेहिमेला ब्रेक लागला. याच सुमार खेळीचा फायदा घेत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने शुक्रवारी इंदूरच्या हाेळकर स्टेडियमवर भारताला १८.५ षटकांत ९ गड्यांनी धूळ चारली. विजयासाठी मिळालेले अवघ्या ७६ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ७६ मिनिटांत गाठले. ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये चाैथ्या कसाेटीला सुरुवात हाेणार आहे.
टीमचे दिग्गज अपयशी; पुजारा एकमेव अर्धशतकवीर
रोहित 12/12 शुभमन 21/5 पुजारा 1/59 कोहली 22/13
ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक; भारताला विजयाची गरज सलगच्या पराभवाची मालिका खंडित करत ऑस्ट्रेलियाने इंदूरच्या मैदानावर भारतावर माेठ्या फरकाने मात केली. याच विजयाच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखदारपणे प्रवेश करता आला. यंदा ७ जूनपासून आेव्हलवर ही फायनल रंगणार आहे. आता भारताला आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अहमदाबादमध्ये हाेणारी चाैथी कसाेटी जिंकावी लागणार आहे. यातून भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित हाेणार आहे. तसेच पराभव वा ड्राॅ झाल्यास भारताचा प्रवेश श्रीलंकेच्या न्यूझीलंडविरुद्ध २-० अशा विजयावर अवलंबून असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.