आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Border Gavaskar Trophy | Khawaja's First Australian Century In The Series

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी:ख्वाजा मालिकेत पहिला ऑस्ट्रेलियन शतकवीर

अहमदाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलिया संघाच्या चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर 4 बाद 255 धावा

सलगच्या पराभवातून विजयी ट्रॅकवर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघापाठाेपाठ आता खेळाडूही यजमान भारताविरुद्ध दर्जेदार खेळीसाठी फाॅर्मात आले आहेत. याचाच प्रत्यय पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाचे गुरुवारी टीम इंडियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या दिवशी आणून दिला. त्याने पहिल्या डावात नाबाद १०४ धावांची खेळी केली. यासह ताे यजमान भारताविरुद्ध सुरू असलेल्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेमध्ये पहिला ऑस्ट्रेलियन शतकवीर ठरला. त्याने नाबाद खेळीतून करिअरमध्ये १४ व्या कसाेटी शतकाची नाेंद केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ४ गड्यांच्या माेबदल्यात २५५ धावा काढल्या. आता ख्वाजा व कॅमरून ग्रीन (४९) मैदानावर कायम आहेत. शमीने २ आणि अश्विन-रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ बळी घेतला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पाच वर्षांनंतर भारतामध्ये यजमान संघाविरुद्ध पहिले कसाेटी शतक साजरे करता आले.

उस्मान ख्वाजा तरबेज सलामीवीर; आता ठरला ऑस्ट्रेलियाचा मालिकेत टाॅप-स्काेअरर फलंदाज ३६ वर्षीय उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलिया संघाचा परफेक्ट आणि तरबेज सलामीवीर ठरत आहे. यामुळेच ताे मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा टाॅप-स्काेअरर फलंदाज ठरला आहे. त्याची आतापर्यंतची सलामीवीरच्या भूमिकेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्याने ३३ डावांमध्ये ६८.२६ च्या सरासरीने १७७५ धावांची कमाई केली. यामध्ये सहा शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यादरम्यान पाकिस्तान आणि भारताविरुद्ध ही शतके साजरी केली आहेत. त्याने गतवर्षी पाकविरुद्ध तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत ४९६ धावा काढल्या हाेत्या.

4 वेळा स्टीव्हन स्मिथला त्रिफळाचीत केेले रवींद्र जडेजाला. यासह जडेजा हा सर्वाधिक वेळा स्मिथला बाद करणारा एकमेव गाेलंदाज. 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या सलामीवीर फलंदाजाचे भारताविरुद्ध पहिले शतक नाेंद झाले आहे. यापुर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाॅर्नरचे सिडनी कसाेटीत शतक हाेेते.

मालिकेमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्या सेशनमध्ये पडली नाही विकेट अहमदाबाद येथील खेळपट‌्टी वेगळी ठरत आहे. या ठिकाणी गाेलंदाजांना नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्रिफळावर अॅटक करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. याचाच फायदा घेत सलामीवीर उस्मान ‌‌ख्वाजा आणि प्रभारी कर्णधार स्मिथने दुसऱ्या सत्रात संयमी खेळी करत एकही विकेट पडू दिली नाही. यामुळे गत दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतात कसाेटीच्या पहिल्या दाेन सत्रादरम्यान एकही बळी गाेलंदाजांना घेता आला नाही. उस्मान ख्वाजाने करिअरमध्ये भारताविरुद्ध सहावे कसाेटी शतक साजरे केले. त्याने २५१ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने स्मिथसाेबत तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली.

राेहितनंतर दुसरा शतकवीर ख्वाजा : बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेमध्ये यजमान टीम इंडियाच्या कर्णधार राेहितने शतक झळकावले. त्यापाठाेपाठ आता ख्वाजाने हे यश संपादन केेले. यासह ताे राेहितनंतर मालिकेतील दुसरा शतकवीर फलंदाज ठरला.

बातम्या आणखी आहेत...