आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी मालिकेतील चाैथी लढत ही खऱ्या अर्थाने टेस्ट क्रिकेटला उजाळा देणारी ठरली. अहमदाबाद कसाेटीचा पहिल्यासारखाच दुसऱ्या दिवसाचाही खेळ लक्षवेधी ठरला. यादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी याच खेळीतून कसाेटी क्रिकेटची संस्कृती पुन्हा उजळून टाकली. गुरुवारपासून मैदानावर कायम असलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाने तब्बल ६११ मिनिटे ४२२ चेंडूंचा सामना केला. या दहा तासांच्या खेळीतून त्याने १८० धावा काढल्या. त्याने पाचही सेशनदरम्यान मैदानावर कायम राहून भारतीय संघाविरुद्ध वैयक्तिक सर्वाेच्च खेळी करता आली. यातून ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावामध्ये ४८० धावा काढल्या. यामध्ये कॅमरून ग्रीनने (११४) शतकाचे माेलाचे याेगदान दिले. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात दिवसअखेर बिनबाद ३६ धावा काढल्या आहेत. अद्याप ४४४ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताचा कर्णधार राेहित (१७) व शुभमन गिल (१८) मैदानावर आहेत.
४४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची भारतात द्विशतकी भागीदारी उस्मान ख्वाजा- कॅमरून ग्रीनने पाचव्या विकेटसाठी ३५८ चेंडूंमध्ये २०८ धावांची भागीदारी रचली. यातून ऑस्ट्रेलिया संघाने ४४ वर्षांनंतर भारत दाैऱ्यावर द्विशतकी भागीदारी केली. यापूर्वी १९७९ मध्ये ऑस्ट्रेिलया संघाच्या जाेडीने हे यश संपादन केले हाेते.
ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या ६ पैकी पाच विकेट आर. अश्विनने घेतल्या भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विन हा दुसऱ्या दिवशी टी-टाइमनंतर ऑस्ट्रेलिया संघासाठी अडचणीचा ठरला. त्याने सर्वाेत्तम खेळीतून ऑस्ट्रेलिया संघाचे शेवटचे ६ पैकी ५ फलंदाज झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने ४७.२ षटकांत ९१ धावा देताना पहिल्या डावामध्ये सहा बळी घेतले आहेत. यासह त्याच्या नावे आता सर्वाधिक ३२ वेळा डावात ५ पेक्षा अधिक बळी घेण्याची विक्रमी कामगिरी नाेंद झाली. हे यश संपादन करणारा ताे भारताचा एकमेव गाेलंदाज ठरला. यादरम्यान त्याने शतकवीर कॅमरूनसह अॅलेक्स केरी, स्टार्क, नॅथन लियाेन, टाेड मुर्फी यांना बाद केले.
कॅमरून ग्रीनचे पहिले कसाेटी शतक भारत दाैऱ्यावर आलेल्या कॅमरून ग्रीनने आता चाैथ्या कसाेटीत माेठी खेळी केली. यासह त्याला आपल्या करिअरमध्ये पहिल्या कसाेटी शतकाची नाेंद करता आली. त्याने वेगवान खेळी करताना १४० चेंडूंचा सामना करत १८ चाैकारांतून ११४ धावांची खेळी साकारली. यासह ताे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा शतकवीर फलंदाज ठरला. त्याने ख्वाजासाेबत माेठी भागीदारीही रचली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.