आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणारी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिने राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी मोठा आरोप केला आहे. तीचा मानसिक छळ होत असल्याची लव्हलिनाची तक्रार आहे. राष्ट्रकुल खेळ सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना तिला प्रशिक्षकासोबत सराव करण्याची परवानगी दिली जात नाही.
लव्हलिनाने ट्विट करून म्हटले की, 'आज मी अत्यंत दु:खाने सांगत आहे की, माझ्यासोबत खूप छळ होत आहे. ज्या प्रशिक्षकाने मला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्यासाठी मदत केली, त्यांना वेळोवेळी काढून टाकले जात आहे. याचा माझ्या प्रशिक्षण प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला आहे. इंग्लंडमध्ये येण्याआधीही मला माझ्या प्रशिक्षकासोबत प्रशिक्षण घेणे खूप कठीण वाटले. हात जोडून वारंवार विनवण्या करूनही खूप दिवसांनी ते जोडले जातात.
मला ट्रेनिंगमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो आणि मानसिक छळ होतो. आतापर्यंत माझी प्रशिक्षक संध्या यांना राष्ट्रकुल खेळांच्या गावाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यांना प्रवेश मिळत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील माझ्या सामन्याला फक्त 8 दिवस शिल्लक असताना हे घडत आहे. माझ्या अन्य प्रशिक्षकालाही भारतात परत पाठवण्यात आले आहे.
मला फोकस कसे करावे हे माहित नाही. त्यामुळे गेल्या जागतिक स्पर्धेतील माझी कामगिरीही खालावली. आता मला होत असलेल्या राजकारणामुळे राष्ट्रकुल खेळ खराब करायचे नाही. मला आशा आहे की मी देशासाठी हे राजकारण मोडून माझ्या देशासाठी पदके आणेन. जय हिंद.'
कोणाचेही नाव घेतले नाही
लव्हलिनाने हे आरोप कोणावर केले आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. याबाबत दिव्य मराठी प्रतिनिधीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर दिव्य मराठी प्रतिनिधीने तिला मेसेज केला. तेव्हा ती म्हणाली की मी कोणावर आरोप करत नाहीये. मी ट्विट करून माझ्यासोबत काय होत आहे ते सांगितले आहे.
यानंतर दिव्य मराठी प्रतिनिधीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पीसी भट्ट यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की लव्हलिना नुकतीच आमच्यासोबत नाश्ता करून गेली आहे. असे काही घडले असते तर ती आम्हाला नक्की सांगीतले असते.
दिव्य मराठी प्रतिनिधी राजकिशोर यांनी त्यांना प्रशिक्षक येण्यास उशीर का झाला असा पुढील प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की त्यांचे नाव IOA कडून पुढे आले नाही. म्हणूनच ते उशिरा आले. त्याच वेळी, गेम्स व्हिलेजमध्ये प्रवेशाबाबत विचारले असता, तेथे केवळ मर्यादित खेळाडू आणि प्रशिक्षक जाऊ शकतात, असे त्यांनी सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.