आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
घरातील अठराविश्व दारिद्र्य दुर करण्यासाठी अाव्हानात्मक अशा मिश्र मार्शल आर्ट््सची (एमएमए) निवड केली. प्रचंड मेहनतीतून दर्जा उंचावत अल्पावधीत सलग तीन फाइट जिंंकून वेगळा ठसा उमटवला. हा संघर्षमय प्रवास अाहे भारतीय मिश्र मार्शल आर्ट््स फायटर रोशन मेनमचा. ताे सध्या सिंगापूरच्या वन चॅम्पियनशिपमध्ये खेळतो. त्याने ८ नोव्हेंबर २०१९ मध्ये पदार्पण केले. सलग तीन लढती त्याने जिंकल्या. यात कम्बोडिया, चीन व इंडोनेशियाच्या खेळाडूंना पराभूत केले. मणिपूरच्या या फायटरचा इंडोनेशियाच्या केलिमवरील विजय महत्त्वपूर्ण ठरला. रोशनने ही लढत २ मिनिटे ४० सेकंदांत जिंकली होती.
गुरू हनुमान आखाड्यात कुस्तीचा सराव
रोशन मूळ कुस्तीपटू आहे, तो दिल्लीमधील प्रसिद्ध गुरू हनुमान आखाड्यात सराव करत होता. त्याने भारतासाठी अनेक हौशी लढती जिंकल्या आहेत. तो गरिबीतून बाहेर पडण्यासाठी एमएमएकडे वळाला. रोशनने म्हटले की, “एमएमए फार कठीण असल्याचे मला माहिती होते. मात्र, कठोर मेहनत घेऊन मी इव्हॉल्व्ह जिममध्ये स्थान मिळवले. मला बॉक्सिंग, किकिंग, स्ट्रायकिंग व कुस्ती शिकायची आहे. मी हार मानणार नाही.’ इव्हॉल्व्ह जिममध्ये सराव करत असलेल्या रितु फोगाटची गोष्ट रोशन सारखी जबरदस्त नाही.
बॉक्सर हाेण्याचे स्वप्न:
रोशन बालपणापासून मेरीकोम सारखा मोठा बाॅक्सर बनू इच्छित होता. मात्र, उंची कमी असल्याने त्याला फक्त टेबल टेनिस खेळण्याची परवानगी मिळाली होती. रोशन म्हणतो की, “मला युवा मल्लांसोबत सराव करण्याची संधी मिळाली, जेव्हा आमच्या गावात राष्ट्रीय खेळाडूंचे शिबिर आयोजित केले होते.’ त्यानंतर त्याच्या आईने पैसे जमा करून रोशनला दिल्लीमधील गुरू हनुमान आखाड्यात सरावाला पाठवले. या आखाड्यातून सतपाल सिंग, राजीव तोमर सारखे मल्ल तयार झाले आहेत. एका १४ वर्षीय मणिपुरी मुलाला या आखाड्यात सराव करण्यास मिळणे, मोठी गोष्ट होती.
मतपरिवर्तनाने घेतला निर्णय
ही वेळ होती, तेव्हा माझे आयुष्य खराब होण्यास सुरुवात झाली. मी सिगारेट ओढायला लागलो, दारू पित होतो. चुकीच्या संगतीला लागलो. एकदा मी माझ्यासोबत गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. तेव्हा निर्णय घेतला आपली आक्रमकता एमएमए रिंगमध्ये दाखवणार.’ असेही ताे म्हणाला. त्यानंतर रोशनने दिल्ली गाठून एमएमए जिममध्ये प्रवेश मिळवला. पैसे नसल्याने प्रशिक्षक विशाल सहगलने त्याचे शुल्क भरले. विशाल त्याला प्रशिक्षण देण्यास तयार झाला आणि रोशनला जिममध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्याची व्यवस्था करून दिली. रोशनने म्हटले की,”मला माहिती आहे, जगभरातील हजारो मुले सिंगापूरच्या इव्हॉल्व्ह जिममध्ये प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीत असतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.