आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा वर्ल्ड कप:ब्राझील युरोपियन फुटबॉलची नर्सरी..

तारिक पंजा/ इलियन पेल्टियर/ राॅरी स्मिथ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

{ खास युराेपियन क्लबसाठी तयार केले जातात खेळाडू {ध्येय गाठण्यासाठी युवा खेळाडूंचे घरावर तुळशीपत्र

सध्या युराेपियन फुटबाॅलची जागतिक स्तरावर माेठी हवा आहे. येथील युवा खेळाडूंनी प्रचंड मेहनतीतून कामगिरीचा दर्जा उंचावत फुटबाॅलच्या विश्वामध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे सध्या या खेळाडूंना युराेपियन क्लबमध्ये मानाचे स्थान आहे. तसेच त्यांना आपल्यासाेबत करारबद्ध करण्यासाठी युराेपियन क्लबमध्ये चढाआेढ सुरू असते. या गुणवंत आणि स्टार खेळाडूंना घडवण्यासाठी ब्राझीलची पाल्मेरास अकादमी सातत्याने मेेहनत घेत असते. या अकादमीच्या अनमाेल मार्गदर्शनाखाली अनेक स्टार फुटबाॅलपटू तयार झाले आहेत. या अकादमीमधील प्रशिक्षक काेणत्याही प्रकारच्या सूचना न देता खेळाडूंना थेट रस्त्यावर उतरवतात. त्यानंतर टीमला याेग्य प्रकारच्या सूचना देत आखलेल्या डावपेचांची माहिती दिली जाते. यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असते. यातून किरकाेळ दुखापतही सहन करण्याची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण हाेते. यामुळे खेळाडू दर्जेदार खेळी करण्यासाठी प्रचंड मेहनतीने खेळत असतात, अशी प्रतिक्रिया अकादमीच्या प्रशिक्षकांनी दिली. या ठिकाणी हाेत असलेल्या स्ट्रीट फुटबाॅलमुळे युवांच्या गुणवत्तेला चालना मिळाली. त्याच्या कामगिरीचा दर्जाही वेगाने उंचावला.

नैराेबीच्या अकादमीचा युराेपात दबदबा ब्राझीलबराेबरच नैराेबी येथील प्रशिक्षण अकादमीमध्ये दर्जेदार फुटबाॅलपटू तयार झाले आहेत. सध्या हेच खेळाडू युराेपियन फुटबाॅल स्पर्धा गाजवत आहेत. यातून नैराेबीचाही युराेपात माेठा दबदबा आहे. नैराेबीच्या एक्स्प्रेस साॅकर अकादमीने आतापर्यंत अनेक स्टार फुटबाॅलपटू घडवले आहेत. यासाठी जगभरातून या ठिकाणी युुवा खेळाडूंना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.

बातम्या आणखी आहेत...