आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखेर ब्राझीलचा फुटबॉल संघ लयीत आला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर नेमारच्या उपस्थितीत ब्राझीलने द. कोरियाला ४-१ ने पराभूत केले. चारही गोल पहिल्या हाफमध्ये झाले. पराभवानंतर द. कोरिया वर्ल्डकपमधून बाहेर झाला. आता शर्यतीत आशियाचा एकही संघ नाही. ब्राझीलने गोल केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला चिडवायला सुरुवात केली. यावर फुटबॉल दिग्गजांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. म्हणाले, ब्राझीलचा संघ लयीत दिसत आहे. याचाच त्यांना अभिमान वाटत आहे. खेळाडूंनी कधीच मर्यादा ओलांडू नयेत.
मोरोक्को प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत; २०१० चा वर्ल्डकप विजेता स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये केले पराभूत... पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाने साेमवारी मध्यरात्री फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ब्राझील संघाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये दक्षिण काेरियावर मात केली. ब्राझील संघाने ४-१ अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. दाेहातील स्टेडियम ९७४ वर विनिसियस न्यूनिअर (७ वा मि.), रिचर्लिसन (२९ वा मि.) नेमार (१३ वा मि.) आणि लुकास पेक्वेटा (३६ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून ब्राझील संघाचा विजय निश्चित केला. दक्षिण काेरियासाठी सेउंग हाे (७६ वा मि.) याने एकमेव गाेल केला. यासह ब्राझील पहिल्याच हाफमध्ये चार गाेल करणारा यंदा पहिला संघ ठरला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.