आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाच वेळचा विश्वविजेता ब्राझील संघ आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी ब्राझील आणि दक्षिण काेरिया यांच्यात साेमवारी सामना हाेणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. या सामन्यात ब्राझील संघाचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, दक्षिण काेरिया संघ हा चमत्कारिक खेळी करण्यात तरबेज आहे. याशिवाय सध्या ब्राझील संघाचा हुकमी एक्का नेमारही दुखापतीने त्रस्त आहे. त्याचा या सामन्यातील सहभाग अनिश्चित मानला जात आहे. यातून ब्राझील टीमला विजयासाठी माेठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. मात्र, ब्राझील टीमचा डिफेन्स भेदण्यासाठी आणि आक्रमणाला राेखण्यासाठी काेरिया संघाला माेठी कसरत करावी लागेल. कारण, गत २३ वर्षांपासून काेरियाचा टीमचा ब्राझीलवर मात करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
-विश्वचषकात हे दाेन्ही संघ पहिल्यांदाच समाेरासमाेर येत आहेत. १९९९ पासून ब्राझील संघाला आपली विजयी माेहीम कायम ठेवता आली. त्यामुळे आताही ब्राझील संघ विजयाचा कित्ता गिरवण्याच्या तयारीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.