आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा वर्ल्डकपमध्ये सर्वात रोमांचक विजय:ब्राझीलचे स्वप्न भंगले, क्रोएशिया संघाने सेमीफायनलमध्ये मारली धडक

दोहा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या वर्ल्डकपमधील अत्यंत रोमांचक सामन्यात क्रोएशियाने ५ वेळचा चॅम्पियन ब्राझीलला स्पर्धेबाहेर केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ ब्राझीलला ४-२ ने हरवले. प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानविरुद्धचा सामनाही त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्येच जिंकला होता.

{क्रोएशिया दुसऱ्यांदा सेमीत. ब्राझीलला २० वर्षांपासून वर्ल्डकपची हुलकावणी. स्पर्धेत १९८९ नंतर दुसऱ्यांदा ब्राझील पेनल्टी शूटमध्ये पराभूत. {क्रोएशियाचा गोलकीपर डॉमिनिकने ब्राझीलचे तब्बल ११ गोल रोखले. हा यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक गोल रोखण्याचा विक्रम ठरला आहे.

नेमारने केला विक्रमी गोल नेमारने एक गोल करत ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांची बरोबरी केली. दोन्ही खेळाडूंचे आता ७७ गोल झाले.

आजचे सामने मोराेक्को-पोर्तुगाल रात्री ८:३० वाजता : मोराेक्को प्रथमच तर पोर्तुगाल १६ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत. दोघे वर्ल्डकपमध्ये दोनदा भिडले. १-१ सामना जिंकले.

इंग्लंड-फ्रान्स रात्री १२:३० वाजता : दोघेही दावेदार. फ्रान्स गत चॅम्पियन. दोघे ५ सामने खेळले. ३ फ्रान्स, १ इंग्लंड जिंकला. यंदा इंग्लंड सर्व सामने जिंकला.

ब्राझीलचा रिचार्लिसन व क्रोएिशयाचा लुका मॉड्रिच.

बातम्या आणखी आहेत...