आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:ब्राझीलचे काेच टिटेंचा राजीनामा; पेप गुआर्डिओला यांना संधी

सा पाउलाे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत उपविजेत्या क्राेएशिया संघाविरुद्ध पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हाच पराभव जिव्हारी लागल्यानंतर टिटे यांनी तडकाफडकी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. याशिवाय त्यांचा सहा वर्षांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. आता इंग्लिश प्रीमियर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबचे सध्याचे काेच पेप गुआर्डिओला यांची ब्राझील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती हाेणार आहे. यातून आता ब्राझील महासंघ आपल्याच देशाच्या माजी खेळाडूला मॅनेजर करण्याच्या पंरपरेला ब्रेक देणार आहे. सध्या ब्राझील फुटबाॅल महासंघ (सीबीएफ) व गुआर्डिओला यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...