आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रेक डान्स आता अधिकृतपणे ऑलिम्पिक खेळ झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) २०२४ मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेत त्याचा समावेश केला आहे. आयओसीने तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लायंबिंग आणि सर्फिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीन खेळांचा कोरोनामुळे एक वर्षासाठी स्थगित करण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात येणार होता. टोकियो ऑलिम्पिक आता २३ जुलै २०२१ पासून होईल.
ऑलिम्पिकमध्ये ब्रेक डान्सला ‘ब्रेकिंग’ नावाने ओळखले जाईल. त्याला ‘बी-बॉइंग’ नावाने ओळखले जाते. हा एक लोकप्रिय नृत्यप्रकार असून आफ्रिकी-अमेरिकी लोकांमध्ये हिपहॉप संस्कृतीच्या रूपाने विकसित होऊन नंतर न्यूयॉर्क शहरातील लॅटिन तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. ७० च्या दशकात अमेरिकेत हिपहॉपला पसंत करणारे त्याला याच नावाने ओळखायचे. २०१८ मध्ये ब्यूनस आयर्स यूथ ऑलिम्पिकमध्ये त्याचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला होता. आता तो ऑलिम्पिकमध्ये असेल.
ब्रेक डान्सिंगमध्ये चार प्रकार
1. टाॅपराॅक : यात उभे राहूनच कदमताल दाखवले जाते. यात क्रोध, शांत आणि उत्तेजनाचे भाव दाखवले जातात. यात इतर अनेक प्रकारचे नृत्यप्रकार पॉपिंग, लॉकिंग इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
2. डाऊनराॅक : याला फुटवर्क किंवा फ्लोअरवर्क या नावाने ओळखले जाते. यात हात आणि पाय दोन्हींचा वापर केला जातो.
3. पाॅवर मूव्हज : हा एक प्रकारचा कसरतीशी संबंधित प्रकार आहे. यात चाल, वेग, सहनशीलता आणि शक्तीची गरज असते.
4. फ्रीझ : ही एक प्रकारची कलात्मक अवस्था आहे. यात ब्रेकरला स्वत:ला जमिनीपासून वर लटकावे लागते. संगीताची लय प्रभावशाली करण्याचा हेतू असतो. तसेच नृत्याचा शेवट असल्याचे दर्शवते.
भारतातही खूप लोकप्रिय, मात्र क्रीडा प्रकार म्हणून एकही संस्था नाही
भारतातही ब्रेक डान्सिंग बघायला मिळते. मात्र, एक क्रीडा प्रकार म्हणून आतापर्यंत कोणत्याही संस्थेची स्थापना झालेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईत झालेल्या जगातील सर्वात प्रतिष्ठित ‘रेड बुल बीसी वन’ ब्रेक डान्स स्पर्धेत भारताची जोहाना रॉड्रिग्ज अंतिम फेरीत दाखल झाली होती. त्यांनी ३० देशांतील ७० नर्तकांना टक्कर दिली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.