आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Brill Mbélé's Home Country Will Sing Against The Cameroon Team; Mela's Contribution To The Victory Of The Switzerland Team

फिफा वर्ल्ड कप:ब्रिल एमबाेलाे चा जन्मभूमी असलेला देश कॅमरून संघाविरुद्ध गाेल; स्वित्झर्लंड टीमच्या विजयात माेलाचे याेगदान

क‍तार2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वित्झर्लंड संघाच्या पहिल्याच सामन्यातील विजयामध्ये ब्रिल एमबाेलाेने माेलाचे याेगदान दिले. त्याने सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला गाेल केला. त्यानंतर सामन्यात एकही गाेल हाेऊ शकला नाही. त्यामुळे या सामन्यात ब्रिल एमबाेलाेची खेळी लक्षवेधी ठरली. त्याचा जन्म हा कॅमरूनमध्येच झालेला आहे. यासह त्याने आपलीच जन्मभूमी असलेल्या कॅमरून संघाविरुद्ध विश्वचषकात गाेल केला. त्याने स्वित्झर्लंड संघाचे प्रतिनिधित्व करताना हे यश संपादन केले. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे फिफाच्या इतिहासात पहिलाच फुटबाॅलपटू ठरला आहे. ‘कॅमरून ही तुझी जन्मभूमी आहे. मात्र, आता तू स्वित्झर्लंड संघाकडून खेळत आहे. त्यामुळे मैदानावर ही जन्मभूमी तुझ्यासाठी प्रतिस्पर्धीच्या भूमिकेत आहे. त्यामुळे तुला नेहमीसारखीच खेळी करावी लागेल. मैदानाच्या बाहेर याच संघातील खेळाडू हे तुझे जवळचे मित्र आहेत, अशा शब्दांत स्वित्झर्लंड संघाचे प्रशिक्षक मुरत याकिन यांनी युवा खेळाडू एमबाेलाेला समजावून सांगितले.

बातम्या आणखी आहेत...