आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत:वाघमारेच्या नेतृत्वात महाराष्ट्राला कांस्यपदक

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे झालेल्या ४० वी वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक आपल्या खात्यात जमा केले. छत्रपती संभाजीनगरचा अनुभवी राष्ट्रीय खेळाडू अनिल वाघमारेने विजयी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. तृतीय क्रमांकासाठीची लढत केरळ विरुद्ध महाराष्ट्र यांच्यात झाली. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक राहिल्यानंतर ५३-५३ गुणांनी बरोबरीत सुटला. दोन्ही संघांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. संघाच्या यशाबद्दल डीएसओ बाजीराव देसाई, पंकज भारसाखळे, सुनील डावकर, सतीश इंगळे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...