आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वृषाल बेल्हेकरसह मुंबई विद्यापीठाची साक्षी परमार आणि शिवाजी विद्यापीठ काेल्हापूरचा राेहन कांबळे, शुभम जाधव साेमवारी २५ व्या राज्य क्रीडा महाेत्सवामध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. यजमान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाच्या साेनाली पवारने राैप्य आणि सुरेखा आडेने कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. काेल्हापूरचा शुभम जाधव हा पुरुषांच्या भालाफेक गटामध्ये चॅम्पियन ठरला. यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शुभम इंगाेलेने राैप्यचा बहुमान मिळवला. पुण्यातील विद्यापीठाचा अमाेल रसाळ कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तसेच ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये यजमान संघाच्या रामेश्वर विजय मुंजाळने कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये जळगावच्या विद्यापीठातील रिंकी पावरा कांस्यपदक विजेती ठरली. तिने १८ मिनिट १३.५ सेकंदात निश्चित अंतर गाठले. राहुरी येथील विद्यापीठाच्या वृषालने पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये साेनेरी यश संपादन केले. त्याने १४.१९ मीटर उडी घेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. याच गटामध्ये नाशिकच्या मुक्त विद्यापीठातील नीलेश आवळे राैप्यपदक विजेता ठरला.
साक्षीने टाकले यजमानांच्या दाेघींना मागे मुंबई विद्यापीठाच्या साक्षी परमारची महिलांच्या भालाफेक गटामध्ये सरस कामगिरी करत यजमानांच्या दाेन्ही भालाफेकपटूंना मागे टाकले. तिने ४१.९९ मीटरचा भाला थ्राे केला. यासह ती या गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तसेच यजमान संघाच्या साेनाली पवारने ३७.९७ मीटर भालाफेक करत राैप्यपदक जिंकले. त्यापाठाेपाठ सुरेखा आडे (३३.५७ मी.) कांस्यपदकाची मानकरी ठरली. पुरुष गटामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या शुभम जाधवने सुवर्णपदक पटकावले.
अमरावतीच्या सचिनला कांस्यपदक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा लांब पल्ल्याचा धावपटू सचिन नान्हे कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने ४०० मीटरची शर्यत ४९.३० सेकंदांत पूर्ण केली. या गटामध्ये शिवाजी विद्यापीठाचा राेहन सुवर्णपदक विजेता ठरला. त्याने ४८.१० सेकंदांत हे अंतर गाठले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या अनुज यादवने राैप्यपदक जिंकले. बास्केटबाॅल : यजमान संघाची विजयी हॅट्ट्रिक यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बास्केटबाॅल संघाने घरच्या मैदानावर साेमवारी विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. यजमान संघाने सामन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे संघाचा ५९-३० ने पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.