आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Buldanya Vaishnavi To Captain Maharashtra In Under 17 National Women's Football Championship

राष्ट्रीय महिला फुटबाॅल:बुलडाण्याची वैष्णवी  महाराष्ट्राच्या कर्णधारपदी, 17 वर्षांखालील राष्ट्रीय महिला फुटबाॅल स्पर्धेत खेळणार

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाण्याची गुणवंत युवा गोलरक्षक वैष्णवी सोनुनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ एआयएफएफच्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय महिला फुटबाॅल स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेला गुवाहाटी येथे उद्या शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. ही स्पर्धा गुवाहाटी येथे १८ जून ते ४ जुलैपर्यंत आयाेजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र व त्रिपुरा यांच्यात सलामी सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी नुकताच महाराष्ट्राचा महिला संघ जाहीर करण्यात आला. याच्या कर्णधारपदी वैष्णवीची निवड करण्यात आली. उपकर्णधारपदी कोल्हापूरच्या शर्वरीची निवड करण्यात आली आहे. संघामध्ये नाशिकच्या रितिका सिंग, अदिती व यवतमाळच्या प्रेरणाचा समावेश आहे.

महाराष्ट्र संघ : वैष्णवी सोनुने (कर्णधार), हृतिका बंदसोडे, निकिता, साक्षी, सानिया पाटील, राजनंदिनी भाेईटे, संजना गुप्ता, अदिती गाडेकर, शर्वरी डाेणगावकर, आरती काटकर, पूर्वा गायकवाड, पूजा गुप्ता, प्रिया राठाेड, रितिका सिंग, सुमय्या शेख, दिव्या पवार, साैम्या कागले, निंदा सतारमेकर, महक शेख, प्रेरणा मेश्राम.

बातम्या आणखी आहेत...