आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटनेस टेस्ट:बुमराह, हर्षल पटेल पूर्णपणे फिट; वर्ल्डकपचा मार्ग माेकळा

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाच्या वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेलचा यंदाच्या टी-२० वि‌श्वचषकातील सहभागाचा मार्ग सुकर झाला आहे. हे दाेघेही रविवारी फिटनेस टेस्टमध्ये पास झाले आहेत. त्यामुळे तंदुरुस्त असलेल्या या दाेघांचीही आगामी वि‌श्वचषकासाठी भारतीय संघात निवड हाेऊ शकते. या दाेघांचा भारतीय संघातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. यंदा ऑक्टाेबर-नाेव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वि‌श्वचषकाचे आयाेजन करण्यात आले आहे. यासाठी येत्या गुरुवारी-शुक्रवारदरम्यान भारतीय संघ जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गंभीर दुखापतीमुळे बुमराह आणि हर्षल पटेल दीर्घ काळापासून भारतीय संघाबाहेर आहेेत. याच गंभीर दुखापतीमुळे त्यांना यूएईमधील आशिया कप स्पर्धेलाही मुकावे लागले. मात्र, आता त्यांनी एनसीएमधील सक्तीची फिटनेस टेस्ट पास केली आहे. आता ते लवकरच मैदानावर परतणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...