आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Busra Khan Interview; Busra Khan Struggle Story | Khelo India Youth Games | Gold Medalist | Busra Khan

कारखान्याच्या स्फोटात वडील गमावले:घरातील वस्तू विकल्या गेले; दुखापत झाली असतानाही, 10 हजारांसाठी धावली, जिंकले सुवर्ण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेलो इंडिया युथ गेम्सच्या 3000 मीटर शर्यतीत 17 वर्षीय बुसरा खानने सुवर्णपदक जिंकले. मध्य प्रदेशातील सीहोर येथील खेळाडूने 10.04.29 मिनिटांच्या वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेपूर्वी पायाला दुखापत झाली होती, परंतु तिने 10,000 रुपयांच्या प्रेरणेने धाव घेतली आणि शेवटी सुवर्ण जिकंले.

इथपर्यंतचा प्रवास बुसरासाठी सोपा नव्हता. काही महिन्यांपूर्वी कारखान्यात झालेल्या स्फोटात तिच्या वडिलांचे निधन झाले. घरातील सामान विकल्या गेले. यानंतरही तिने सतत मेहनत करत सुवर्ण जिंकले.

खेलो इंडिया गेम्स सध्या मध्य प्रदेशची राजधानी भोपाळसह राज्यातील विविध शहरांमध्ये सुरू आहेत. खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिव्य मराठीची टीम या शहरांना भेट देत आहे. दिव्य मराठीने बुसरा आणि तिच्या आईशीही खास बातचीत केली. पुढील स्टोरीत तिच्या संघर्षाची यशोगाथा तिच्याच शब्दात आपण जाणून घेणार आहोत.

2016 मध्ये भोपाळला आली

बुसरा सांगते, '2016 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी माझी भोपाळच्या एथलेटिक्स अकादमीमध्ये निवड झाली. प्रशिक्षक एसके प्रसाद यांच्या देखरेखीखाली येथे सराव केला. राज्यस्तरावर मेहनत करून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न होते, ते 2023 मध्ये पूर्ण झाले. यापूर्वी 2019 मध्ये तिला कांस्यपदक मिळाले होते.

बुसरा खान भोपाळमध्येच प्रशिक्षण घेते. तिने शनिवारी सुवर्णपदक पटकावले.
बुसरा खान भोपाळमध्येच प्रशिक्षण घेते. तिने शनिवारी सुवर्णपदक पटकावले.

लहानपणापासून धावण्याची आवड

बुसराने सांगितले, 'मला धावणे आवडते, मला लहानपणापासूनच धावण्याची आवड होती. अब्बू म्हणजे माझे वडिल लहान बहिणींना सिहोरच्या मैदानावर घेऊन जायचे. जोपर्यंत ते जीवीत होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते. पण, त्यांच्या जाण्यानंतर अडचणी वाढल्या.

बुसरा खानने खेलो इंडियामध्ये 10.04.29 मिनिटांत सुवर्णपदक पटकावले.
बुसरा खानने खेलो इंडियामध्ये 10.04.29 मिनिटांत सुवर्णपदक पटकावले.

कारखान्याच्या स्फोटात वडिलांचा झाला मृत्यू

बुसरा म्हणाली, 'गेल्या वर्षी मे महिन्यात सिहोर येथील केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात वडिलांचा मृत्यू झाला होता. कारखान्यात मजुरांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. माझे संपूर्ण कुटुंब तिथे राहत होते. स्फोट झाला त्यावेळी वडील कारखान्याच्या वर्कशॉपमध्ये काम करत होते. घरी आई आणि लहान बहिणी होत्या. मला ही बातमी कळली तेव्हा मी अकादमीत होते.

घरातील वस्तू विकल्या गेले

बुसराची आई शहनाज खान म्हणाली, 'मुलींचे वडील गेल्यानंतर घरातील सर्व वस्तू विकल्या गेल्या. इतरांच्या मेहरबानीमुळे राशनही येऊ लागले. कारखान्यात बनवलेले क्वार्टरही सोडून द्यावे लागले. बुसरा अकादमीत आहे पण लहान बहिणींनी मैदानावर जाणे बंद केले आहे.

आई आणि दोन बहिणींसह बुसरा.
आई आणि दोन बहिणींसह बुसरा.

कुटुंब भाड्याच्या घरात राहते

बुसराने सांगितले, 'आई आता दोन्ही बहिणींसोबत भाड्याच्या घरात राहते. वडिलांकडून मिळालेल्या भरपाईतून घराचे भाडे जाते. सरकारने आता आम्हा तिघांचेही शिक्षण मोफत केले आहे. मी कॉलेजला आहे, धाकटी बहीण दर्शा नववीत आहे मी आणि आरिया सातवीत आहे.

ती म्हणाली की कोच सर कधीकधी मदत करतात. ते त्यांना राशन मिळवून देतात. काही वेळा जिल्हा प्रशासनाकडूनही मदत मिळते.

'मुलीने देशासाठी पदक जिंकावे'

बुसरा भोपाळ येथील अकादमीमध्ये राहते. जिथे तिला मूलभूत सुविधांसह पळण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या मुलीने देशासाठी पदक जिंकावे हेच बुसराच्याआईचे स्वप्न आहे. घरच्या गरजा भागवता याव्यात म्हणून मुलीला स्पर्धेतील मिळालेल्या बक्षिसाची रक्कमही घरी देते असे बुसराच्या आईने सांगितले.

दुखापत झाली असतानाही, 10 हजारांसाठी धावली

स्पर्धेपूर्वी मुलीच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे आईने सांगितले. पण, तिने 10,000 रुपये जिंकण्यासाठी धाव घेतली आणि सुवर्णपदक जिंकले. वास्तविक, खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूंना मध्यप्रदेश सरकार शिष्यवृत्ती आणि पॉकेटमनीसाठी 10 हजार रुपयाचे बक्षीस देते.. या पैशातून बुसरा तिच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करते.

पदक जिंकल्यानंतर प्रशिक्षक एसके प्रसाद यांच्यासोबत बुसरा.
पदक जिंकल्यानंतर प्रशिक्षक एसके प्रसाद यांच्यासोबत बुसरा.

'वडिल असते तर त्यांना खूप आनंद झाला असता’

बुसराने सांगितले की, शर्यतीपूर्वी ती खूप घाबरली होती. पण प्रशिक्षक सरांनी मला प्रोत्साहन दिले. शर्यतीदरम्यान ते मला सतत मार्गदर्शन करत होते. विजयानंतर बुसरा भावूक झाली आणि म्हणाली, 'माझ्यासाठी पदक खूप महत्त्वाचे आहे. आज वडील इथे असते तर त्यांना जास्त आनंद झाला असता. हे पदक फक्त त्याच्यासाठी आहे.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर बुसरा खानला अश्रू अनावर झाले
सुवर्णपदक जिंकल्यानंतर बुसरा खानला अश्रू अनावर झाले
बातम्या आणखी आहेत...