आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खिल्ली उडवल्याने बटलर, मॉर्गनला होऊ शकते शिक्षा; भारतीयांविरुद्ध वर्णभेदी टीका केल्यामुळे ईसीबीकडून बटलर आणि मॉर्गनची चौकशी

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या कथित वर्णभेदी टीकेसाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) आपल्या राष्ट्रीय मर्यादित संघाचा कर्णधार इयोन मॉर्गन व यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यांची चौकशी सुरू केली आहे. ईसीबीने प्रासंगिक व योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. बटलर व मॉर्गनने या टिप्पणीत भारतीयांची खिल्ली उडवण्यासाठी ‘सर’चा उपयोग केला होता. ओली रॉबिन्सनला २०१२-१३ मध्ये आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी निलंबित केल्यानंतर बटलर व मॉर्गनच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा सुरू झाली होती.

माहितीनुसार बटलरच्या संदेशाचे छायाचित्र जाहीर केले आहे. ज्यात त्याने म्हटले की, ‘मी सर नंबर एकला नेहमी उत्तर देत राहील, माझ्यासारखे, तुमच्यासारखे, माझ्यासारखे.’ मॉर्गनने बटलरला टॅग करत एक संदेश लिहिला की, ‘सर, तुम्ही माझे आवडते फलंदाज आहेत.’ ईसीबीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, ‘आम्ही गत आठवड्यात आक्षेपार्ह संदेशावर सतर्क केले होते. इतर खेळाडूंच्या जुन्या पोस्टवर सार्वजनिकरीत्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आमच्या खेळात कुठलाही भेदभाव नाही. जेथे आवश्यक आहे तेथे आम्ही प्रासंगिक व योग्य कारवाई करण्यासाठी बांधील आहोत.’

रॉबिन्सन सौम्य वागल्यास त्याच्याविरुद्ध सक्ती नको : होल्डिंग
किशोरवयात केलेल्या वर्णभेदी टीकेमुळे इंग्लंडचा क्रिकेटर ओली रॉबिन्सनच्या निलंबनाचे वेस्ट इंडीजचे महान खेळाडू मायकेल होल्डिंग यांनी समर्थन केले. त्याचबरोबर या वेगवान गोलंदाजाला दुसरी संधी मिळायला हवी. चौकशीत त्याने त्यानंतर दुसऱ्यांदा चूक केली नसेल तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करायला नको, अशी भूमिकाही घेतली आहे. या २७ वर्षीय खेळाडूने आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. गतवर्षी पोलिस अधिकाऱ्याच्या मारहाणीत जॉर्ज फ्लाॅइडचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वर्णभेदाविरुद्ध चळवळ वाढली, त्याला होल्डिंग यांनी पाठिंबा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...