आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BWF World (Badminton) Championship 2022; Satwiksairaj Rankireddy, Chirag Shetty, Rankireddy Chirag Shetty Win WBC Bronze, Country's First Medal In Men's Doubles; The Indian Pair Lost In The Semi finals

रंकिरेड्डी-चिराग शेट्टीने WBC मध्ये जिंकले कांस्यपदक:पुरुष दुहेरीत देशाचे पहिले पदक; उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा झाला पराभव

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार शटलर्स सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. चालू हंगामातील हे एकमेव पदक आहे.

एवढेच नाही तर पुरुष दुहेरी प्रकारातील या चॅम्पियनशिपचे हे पहिले पदक आहे. यापूर्वी 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरी प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे हे 13 वे पदके आहे. यामध्ये एक सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्यपदकांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशचा रंकीरेड्डी-महाराष्ट्राचा चिराग शेट्टी शनिवारी टोकियोमध्ये झालेल्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. भारताच्या या जोडीचा एरोन चिया-सू वोई येक या मलेशियाच्या जोडीने 20-22, 21-18, 21-16 ने पराभूत केले.

रेड्डी-शेट्टी जोडीचा सलग सहाव्यांदा पराभूत

मलेशियाच्या खेळाडूंनी सात्विक-चिराग जोडीचा सलग सहाव्यांदा पराभव केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्यांना या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता.

मुलींनी मिळविले 8 पदके

या स्पर्धेत मुलींनी 8 पदके पटकावली आहेत. यापैकी 5 पीव्ही सिंधू आणि 2 सायना नेहवानने जिंकले आहे. सिंधूकडे तिन्ही रंगांची पदके आहेत. तिने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले आहेत. त्याचवेळी सायनाला फक्त रौप्य आणि कांस्यपदक जिंकता आले. या दोघांशिवाय ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने ब्राँझ आणले आहे.

पुरुष गटाबद्दल बोलायचे तर प्रकाश पदुकोणने 1983 मध्ये चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर साई प्रणीतने 2019 मध्ये कांस्य, किंदाबी श्रीकांतने 2021 मध्ये रौप्यपदक, लक्ष्य सेनने 2021 मध्ये कांस्यपदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...