आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) कोरोनामुळे नुकसान टाळण्यासाठी आणखी ४० कर्मचाऱ्यांना कमी केले. सीएच्या बजेटमध्येदेखील जवळपास २०० कोटी रुपयांची कपात केली. मंडळाने म्हटले की, बायोसिक्युअरमुळे सुरक्षेसाठी वाढलेला खर्च व चाहत्यांची उपस्थिती नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले. सीए व इतर राज्य संघटनांमध्ये आतापर्यंत २०० लोकांना कमी केले. हंगामी सीईओ निक हॉकले नवी योजना घेऊन आले आहेत. सीएने म्हटले की, कर्मचाऱ्यांच्या सामोर आणलेल्या नव्या योजनेत वर्षात २०० कोटी रुपयांची कपात दिसून आली आहे. कारण कोविड-१९ चा प्रभाव थोडाफार कमी केला जाईल.’ शेफील्ड, मार्श कप, महिला लीग, बिग बॅश, महिला बिग बॅश लीगला कायम ठेवले. १५ व १७ वर्षे व अ संघाचे विदेश दौरे सध्या रद्द केले.
स्टीव्ह वॉच्या व्यवस्थापकाने दिव्यांगांसाठी जमवले १.५ लाख
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉचा व्यवस्थापक हर्ले मेडकाफने आमच्या दिव्यांग क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी १.५ लाख रुपये निधी जमवला. संघटनेचे सचिव रवी चौहानने म्हटले की, मेडकाफने मदत म्हणून १.५ लाख रुपये निधी जमा केला. हा निधी ३० गरजवंत खेळाडूंना पाठवला. प्रत्येक खेळाडूला ५-५ हजार रुपये मिळाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.