आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनतर्फे प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदा सन २०२०-२१ या वर्षाच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील युवक, युवती व संस्था यांना प्रथम ६ नोव्हेंबरपर्यंत https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यानंतर सदर प्रस्तावाच्या दोन प्रति जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शिफारशीसह खास दूतामार्फत संचालनालयास पाठवणे आवश्यक राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...