आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T20 India Vs Australia | Cricket Match T20 Live Update | Cameron, Mathieu's Flurry Leads Australia To Victory; Bhuvi Harshal's Sumar Gelandaji | Marathi News

पहिला T20:कॅमरून, मॅथ्यूच्या झंझावाताने ऑस्ट्रेलिया विजयी; भुवी-हर्षलची सुमार गाेलंदाजी, भारतावर 4 गड्यांनी मात

मोहाली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर कॅमरून ग्रीन (१ बळी, ६१ धावा), मॅथ्यू वेड (नाबाद ४५) आणि पॅट कमिन्सने (नाबाद ४) झंझावाती कामगिरीतून ऑस्ट्रेलिया संघाला मंगळवारी यजमान टीम इंडियाविरुद्ध सलामीला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील पहिल्याच टी-२० सामन्यात भारतावर ४ गड्यांनी मात केली.

भुवनेश्वर व हर्षलने ८ षटकांत १०१ धावा दिल्याने भारताचा पराभव झाला. यासह ऑस्ट्रेलिया टीमने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. यजमान टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना घरच्या मैदानावर ६ बाद २०८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने १९.२ षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.

भारताकडून अक्षर पटेलने ३, उमेश यादवने २ बळी घेतले. टीम इंडियाच्या सलामीवीर लाेकेश राहुल (५५) आणि हार्दिक पंड्याने (नाबाद ७१) पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. राहुलने टी-२० मध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...