आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक वनडेत नंबर वन संघ:कर्णधार बाबर आझमची विक्रमाला गवसणी

वृत्तसंस्था | कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार बाबर आझमने (१०७) यजमान पाकिस्तानला वनडे फॉरमॅटच्या क्रमवारीत मानाचे स्थान मिळवून दिले. न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथ्या वनडेतील विजयासह पाक संघ आता आयसीसीच्या वनडे क्रमवारीत नंबर वनचा संघ ठरला आहे.

सलगच्या चौथ्या विजयाने आता पाक संघाच्या नावे क्रमवारीत ११३ गुणांची नोंद झाली. पाकने चाैथ्या वनडेत १०२ धावांनी न्यूझीलंडवर मात केली. पाकने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३३४ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये न्यूझीलंड टीमला ४३.४ षटकांमध्ये २३२ धावांवर गाशा गुंडाळावा लागला.

बाबरच्या वेगवान ५ हजार धावा : कर्णधार बाबर अाझमला मालिकेत तिसरे शतक साजरे करता अाले. त्याने वनडेमध्ये कमी डावांत ५ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने ९६ डावांतून हे माेठे यश संपादन केले. यासह त्याने हाशिमला (१०१) मागे टाकले.