आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:कर्णधार दीप्तीचे 4  बळी; भारत ब विजयी

रायपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार दीप्ती शर्माच्या (४ बळी, नाबाद १३ धावा) अष्टपैलू खेळीतून भारत ब संघाने मंगळवारी सीनियर महिला टी-२० चॅलेंजर ट्राॅफी स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. ब संघाने सलामी सामन्यात पूनम यादवच्या भारत अ संघावर मात केली. भारत ब संघाने १४.१ षटकांत ९ गड्यांनी सामना जिंकला. शेफाली वर्माने नाबाद ९१ धावांच्या झंझावाती खेळीने ३५ चेंडू राखून भारत ब संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने निर्धारित २० षटकांत सर्वबाद ११० धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारत ब संघाने एका गड्याच्या माेबदल्यात झटपट विजय साजरा केला. सलामीवीर शेफालीने ५२ चेंडूंत ११ चाैकार व ४ षटकारांसह नाबाद ९१ धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...