आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Captain's Rhythm And Power Play Will Be Decisive, After 42 Matches, The World Cup Semi final Team Is Decided.

दिव्य मराठी एक्सप्लेनर:कर्णधाराची लय व पाॅवरप्ले ठरणार निर्णायक, 42 सामन्यांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे संघ निश्चित

चंद्रेश नारायणन | मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभराच्या थरारक सामन्यांनंतर आता यंदाच्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील चारही संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडियासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. बुधवारपासून विश्वचषकातील उपांत्य फेरीला सुरुवात हाेईल. पहिल्याच उपांत्य सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात झुंज रंगणार आहे. त्यानंतर गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना हाेईल. मात्र, यादरम्यान चारही संघांना सावध खेळीतून विजय संपादन करावा लागणार आहे. सध्या या चारही संघांचे नेतृत्व सामन्यागणिक अपयशी ठरत आहे. तसेच संघाची पाॅवरप्लेमधील खेळीही लक्षवेधी ठरत आहे.

1. चारही कर्णधार नेतृत्वात स्टार; कामगिरीत फ्लाॅप राेहित शर्मा, बाबर आझम, विलियम्सन आणि जाेस बटलरने आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर आपापल्या संघांना विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठून दिली. मात्र, त्यांना मैदानावर सामन्यागणिक माेठी खेळी करता आली नाही. त्यामुळे नेतृत्वात स्टार असणारे हेच चारही कर्णधार प्रत्यक्षात मैदानावरील खेळीदरम्यान फ्लाॅप ठरले आहेत. या चारही कर्णधारांनी आपापल्या संघांची निराशा केली. टीम इंडियाच्या कर्णधार राेहितने स्पर्धेत फक्त हाॅलंड संघाविरुद्ध अर्धशतक साजरे केेले. इतर सामन्यांदरम्यान ताे अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या नावे स्पर्धेत फक्त एकाच अर्धशतकाची नाेंद आहे. त्यापाठाेपाठ इंग्लंडचा कर्णधार जाेस बटलर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध चांगली खेळी केली. त्याच्याही नावे स्पर्धेत एकच अर्धशतक नाेंद आहे. तसेच न्यूझीलंडच्या कर्णधार विलियम्सनने स्पर्धेत एकच अर्धशतक झळकावले. त्यामुळे या तिघांच्या नावे प्रत्येकी फक्त एकाच अर्धशतकाची नाेंद आहे. मात्र, पाकचा कर्णधार बाबर आझम हा सपशेल अपयशी ठरला. त्याच्या नावे स्पर्धेत सर्वाेच्च २५ धावांची नाेंद आहे.

2. गाेलंदाजीचा अतिरिक्त पर्याय संघांसाठी कसा ठरताेय फायदेशीर? इंग्लंड वगळता इतर चारही संघांना ग्रुप राउंडमधील सामन्यांदरम्यान अतिरिक्त गाेलंदाजीचा पर्याय हा काहीसा अडचणीचा ठरला. यंदाच्या वि‌श्वचषकादरम्यान गाेलंदाजांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे चित्र सामन्यागणिक नाेंद हाेणाऱ्या विजयातून साकारले गेले. टी-२० मध्ये विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी संघांमध्ये कमीत कमी सहा गाेलंदाजांना दिलेली संधी फायदेशीर ठरते, हेच आतापर्यंत दिसून आले. यादरम्यान इंग्लंड संघाने सात गाेलंदाजांना संधी देत विजयी माेहीम कायम ठेवली. कर्णधार जाेस बटलरनेही गाेलंदाजीत चांगले यश मिळवले.

3. साखळी सामन्यांदरम्यानची बाउंड्रीची छाेटी साइज कितपत संघांना उपयुक्त? ऑस्ट्रेलियातील मैदाने ही माेठी असतात, असे सुरुवातीला म्हटले जात हाेते. मात्र, आता बाउंड्रीची साइज अचानक छाेटी झाल्याची आेरड आहे. अॅडिलेड आेव्हलवरील साइड बाउंड्री ही लहान आहे. हे नेहमी फिरकीपटूंना लक्षात ठेवावे लागते. सिडनीच्या मैदानावरीलही एक साइड लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या सामन्यादरम्यान सर्वच संघांनी ही गाेष्ट लक्षात ठेवून आपल्या फलंदाज आणि गाेलंदाजांना याच साइडवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. आता याच साइजच्या नुसार आगामी उपांत्य सामन्यादरम्यान संघाची डावपेच आखणी असणार आहे.

4. दिग्गज खेळाडूंच्या संथ खेळीचा संघावर कितपत विपरीत परिणाम? संघाचा डाव सावरणारा खास फलंदाज असणे ही महत्वाची बाब आहे, हेच यंदाच्या विश्वचषकादरम्यान सातत्याने दिसून आले. कारण हा टी-२० फाॅरमॅट आहे. त्यामुळे वेगवान खेळी करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी ही संघांसाठी उपयुक्त ठरणारी असते हेच इतरांनी दाखवून दिले. मात्र, यादरम्यानची संथ खेळी ही संघांसाठी मारक ठरते, हेच अपयश घेऊन येते याचाही प्रत्यय संघांना आला. न्यूझीलंडच्या कर्णधार विलियम्सनची ४० चेंडूंमध्ये ४० धावांची सं‌थ खेळी टीकेस पात्र ठरली. त्यामुळे संघ पराभूत झाला. यादरम्यान टीम इंडियाच्या सलामीवीर लाेकेश राहुलवरही बरीच टीका झाली.

5. पाॅवरप्लेदरम्यान गाेलंदाज आणि फलंदाजांना कितपत मदत मिळते ? सामन्यादरम्यान पाॅवरप्लेची भुमिकाही महत्वाची मानली जाते. वि‌श्वचषकादरम्यान पाॅवरप्लेमधील दमदार कामगिरी ही काही संघांसाठी पावरफुल ठरली तर काहींना यादरम्यानच्या सुमार खेळीचा फटका बसला. यादरम्यान फलंदाजांनी तुफानी खेळीतून धावा काढल्यास संघाच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर हाेताे. इंग्लंड संघाच्या अॅलेक्स हेल्स व कर्णधार जाेस बटरलची यादरम्यानची खेळी काैतुकास्पद ठरली. मात्र, याच पाॅवरप्लेमध्ये पाकिस्तान संघाचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले.भारताच्या सलामीवीर आणि गाेलंदाजांनाही दरम्यान काहीसे संमिश्र यश संपादन करता आले.

बातम्या आणखी आहेत...