आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Care Of Players During Practice; 12 Boxes On The Field For Physical Distance, Smooth Practice Football

फुटबॉल:सरावादरम्यान खेळाडूंची काळजी; फिजिकल डिस्टन्सिंगसाठी मैदानावर 12 बॉक्स, सराव सुरळीत

ब्यूनस आयर्स2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळाच्या पुनरागमनासाठी नवे नियम

कोरोनामुळे अर्जेंटिनामध्ये १०० दिवसांपासून व्यावसायिक फुटबॉल बंद आहे. फुटबॉल देशातील सर्वाधिक आवडता खेळ आहे. अशात दोन स्थानिक क्लबने खेळाच्या पुनरागमनासाठी नवे नियम बनवले. वेंडे हुमो एफसी आणि लॉस मिस्मोस यांच्यात ५-ए साइड सामना खेळवण्यात आला. यात प्रत्येक संघात ५-५ खेळाडू असतात. 

मैदानावर १२ बॉक्स बनवण्यात आले. प्रत्येक खेळाडू ड्रिब्लिंग व डिफेंड करताना बॉक्स बाहेर जाणार नाही. बॉक्सच्या बाहेर गेला तर पेनल्टी लावली जाते. त्याला बॉक्समधूनच सहकाऱ्याला चेंडू पास करायचा आहे. याचा उद्देश सोशल डिस्टन्सिंग सोबत खेळण्याचा आहे.

बातम्या आणखी आहेत...