आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील नंबर वन टेनिसपटू कार्लोस अल्कराज ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला आहे. 19 वर्षांचा, अल्कराज हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा सर्वात तरुण टेनिसपटू आहे. वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलिया ओपन 16 ते 29 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे.
अल्कराजने शुक्रवारी सांगितले की, 'ऑफ-सीझन प्रशिक्षणादरम्यान माझ्या उजव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली. मी ऑस्ट्रेलिया ओपनसाठी तयारी केली होती. पोटाच्या दुखापतीमुळे मी प्रथम ATP फायनल आणि नंतर डेव्हिस चषकाला मुकलो.
मला नवीन वर्षात ऑस्ट्रेलिया ओपनमधून पुनरागमन करायचे होते. मी प्रशिक्षणात चांगली कामगिरी करत होतो. पंरतु दुर्दैवाने, माझ्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे मला वर्षातील पहिल्या स्पर्धेला मुकावे लागले आहे.
गेल्या वर्षी जिंकली होती US ओपन
कार्लोस अल्काराझने गेल्या वर्षी US ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कॅस्पर रुडचा चार सेटमध्ये पराभव करून वयाच्या 19 व्या वर्षी पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आणि ATP क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
2004 ते 2021 पर्यंत फेडरर, नदाल, जोकोविच किंवा अँडी मरे हे वर्षाच्या शेवटी ATP नंबर 1 असायचे. अल्कराझनेही 18 वर्षांनंतर ही प्रथा बदलली आणि तो नंबर वन झाला.
एकाच क्ले-कोर्ट स्पर्धेत नदाल आणि जोकोविचला पराभूत करणारा तो ठरला पहिला खेळाडू
19 वर्षीय अल्कराज गेल्या वर्षी नदाल आणि जोकोविचला एकाच क्ले कोर्टवर पराभूत करणारा पहिला खेळाडू ठरला. माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने राफेल नदालचा पराभव केला. यानंतर उपांत्य फेरीत त्याने नोव्हाक जोकोविचचा पराभव केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.