आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंग प्लेअर ऑफ द वीक:भविष्यातील नदाल म्हणून कार्लोसची नवीन ओळख

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

-कार्लोसला भविष्यातील नदाल म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे. स्पेनच्या या १८ वर्षे ११ मिनिटे २० दिवसांच्या टेनिसपटूने टाॅप-१० मध्ये धडक मारली. यासह त्याने आपल्या देशाच्या नदालच्या कामगिरीशी बरोबरी साधली. -नदालने २५ एप्रिल २००५ ला १८ वर्षे १० महिने व २२ दिवसांचे असताना टाॅप-१० मध्ये स्थान गाठले होते. आता १७ वर्षांनंतर याच कामगिरीला कार्लोसने उजाळा दिला आहे. ताे टाॅप-१० गाठणारा सर्वात युवा टेनिसपटू ठरला आहे.

-कार्लोसला आता माद्रिद ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये माजी नंबर वन नदालच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. स्पेनचे हे दाेन्ही टेनिसपटू तिसऱ्यांदा समोरासमोर येणार आहेत. आतापर्यंतच्या दाेन्ही सामन्यांमध्ये नदालने विजय संपादन केला आहे. -कार्लोसने २०२२ मध्ये मियामी ओपनचा किताब जिंकला आहे. हे यश संपादन करणारा ताे पहिला स्पॅनिश पुरुष टेनिसपटू ठरला आहे.

कार्लोस अल्कारेज गार्फिया वर्ष -१८ वर्षे खेळ- टेनिस देश- स्पेन

स्पेनच्या १८ वर्षीय टेनिसपटू कार्लोस गार्फियाने माद्रिद ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने सामन्यामध्ये इंडियन वेल्स चॅम्पियन कॅमरून नाॅरीवर सनसनाटी विजयाची नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...