आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी रविवारी विराट कोहलीने २८वे कसोटी शतक ठोकले. यासोबतच विराटने शतकांचा ३९ महिन्यांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक केले होते. विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतकेही (२८ कसोटीत, ४६ वनडेमध्ये व एक टी-२० मध्ये) पूर्ण झाली आहेत.
{१८६ धावांवर बाद. ८व्या कसोटी द्विशतकापासून दूर राहिला. {ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा खे ळाडू.
{विराटने वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स, ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर, दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम स्मिथला मागे टाकले. तिघांची कसोटीमध्ये प्रत्येकी २७ शतके आहेत. {दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला व मायकल क्लार्कची बरोबरी केली. दोघांची कसोटीत प्रत्येकी २८ शतके आहेत. {सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज. सचिन तेेंडुलकरच्या नावे सर्वाधिक १०० शतकांचा विक्रम.
सामन्यानंतर विराटची पत्नी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर लिहिले, ‘विराटने आजारी असतानाही शतक ठोकले. तो मला नेहमीच प्रेरित करत असतो.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.