आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटालियन ओपन:चॅम्पियन नदाल सलग सेटमध्ये विजयी, इटालियन ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला

रोम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल इटालियन ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. १० वेळचा चॅम्पियन व तिसऱ्या मानांकित नदालने अमेरिकेच्या जॉन इस्नरला सलग सेटमध्ये ६-३, ६-१ ने मात दिली. आता त्याचा सामना कॅनडाच्या डेनिस शापोवालोवशी होईल. दुसऱ्या मानांकित अॅलेक्झांडर ज्वेरेवदेखील अंतिम १६ जणांत पोहोचला. जर्मनीच्या ज्वेरेवने अर्जेंटिनाच्या सेबेस्टियन बाएजला ७-६, ६-३ ने हरवले. कारेन खाचानोव व कॅस्पर रूडने पुढील फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, महिला एकेरीत पाचव्या मानांकित एनेट कोंटावेट व सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिसकोवा दुसऱ्या फेरीत पराभवासह स्पर्धेबाहेर झाल्या. एस्टोनियाच्या कोंटाकेवला क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिचने ६-२, ६-३ ने आणि झेक गणराज्याच्या प्लिसकोवाला स्वित्झर्लंडच्या जिल टेचमेनने ६-२, ४-६, ६-४ ने हरवले. आर्यना सबालेंका, सक्कारी, कोको गॉफ, अझारेंकाने पुढील फेरी गाठली.

बातम्या आणखी आहेत...