आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन लीग:बाय रोनाल्डो, हाय हॉलंड ! रोनाल्डोचा युवेंट्स संघ सलग दुसऱ्यांदा बाहेर; हॉलंड प्रथमच लीगच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळणार

डॉर्टमंड/तुरिनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोर्टोच्या मेहंदी तारेमीला ५४ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवले.

जगातील सर्वात मोठ्या युरोपियन फुटबॉल लीगच्या २०२०-२१ सत्रातील अंतिम-८ संघ निश्चित झाले आहेत. जर्मन क्लब बोरुसिया डॉर्टमंड व पोर्तुगालचा क्लब एफसी पोर्टो चॅम्पियन्स लीगच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचले. बोरुसिया डॉर्टमंडने घरच्या मैदानावर स्पॅनिश क्लब सेविलाविरुद्ध दुसरा लेग २-२ ने बरोबरीत राखला. बोरुसियाने पहिल्या लेगमध्ये सेविलाला ३-२ ने हरवले होते. म्हणजे एकूण गोल ५-४ ने बोरुसियाने बाजी मारली. बोरुसिया तीन सत्रांनंतर लीगच्या अंतिम-८ मध्ये पोहोचला. दुसरीकडे, इटालियन क्लब युवेंट्सने एफसी पोर्टोला घरच्या मैदानावर दुसऱ्या लेगमध्ये ३-२ ने हरवले. पोर्टोने पहिला लेग २-१ ने जिंकला होता. दोन्ही संघांचे ४-४ गोल झाले, मात्र, एफसी पोर्टो अवे गोलच्या आधारे विजयी ठरत अंतिम-८ मध्ये पोहोचला.

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी युवेंट्सने रोनाल्डोला खरेदी केले होते, १५ वर्षांत सलग दुसऱ्यांदा प्री-क्वार्टरमधून संघ बाहेर झाला
युवेंट्स १९९६ मध्ये पहिल्यांदा लीगचा विजेता बनला. क्लबने २०१८ मध्ये क्रिस्टियानाे रोनाल्डोला खरेदी केले होते, कारण पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्यासाठी. मात्र, रोनाल्डो विशेष कामगिरी करू शकला नाही. संघ सलग दुसऱ्यांदा प्री-क्वार्टर फायनलमधून बाहेर झाला. पोर्टोच्या मेहंदी तारेमीला ५४ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवले.

  • नाॅर्वेचा हॉलंड २०२० मध्ये बोरुसियाचा सदस्य बनला. त्याने चालू सत्रात ३० सामन्यांत ३२ गोल केले.
  • त्याने गत ४ लीग सामन्यात २-२ गोल केले. तो सलग ४ सामन्यात २+ गोल करणारा पहिला खेळाडू बनला.
  • त्याने सप्टेंबर २०१९ मध्ये पदार्पण केल्यानंतर कोणताही खेळाडू त्याच्या ऐवढे गोल करु शकला नाही. बायर्न म्युनिकच्या लेवानडोस्की (१९ गोल)दुसऱ्या स्थानी आहे.
  • हॉलंड चॅम्पियन्स लीगमध्ये नॉर्वेकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. त्याने मँचेस्टरचे प्रशिक्षक ओले गनर सोल्सकेयरचा विक्रम मोडला.
  • रोनाल्डो १५ वर्षांत प्रथमच सलग दुसऱ्यांदा क्वार्टर फायनलमध्ये पोहोचू शकला नाही. त्यापूर्वी, सलग नऊ वेळा क्वार्टर गाठली होती.
  • रोनाल्डो येण्यापूर्वी संघ २०१६-१७ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा माद्रिदने पराभव केला होता.
  • रोनाल्डो दोन्ही लेगमध्ये गोल करू शकला नाही. तो लीगच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
  • रोनाल्डोचेे युवेंट्सकडून तिसरे सत्र आहे आणि तिन्ही वेळा उपांत्य फेरी गाठू शकला नाही. यापूर्वी, रिअल माद्रिदकडून सलग ८ वेळा उपांत्य फेरी गाठली होती.

हॉलंड वयाच्या २० व्या वर्षी चॅम्पियन्स लीगमध्ये २० गोल करणारा सर्वात युवा खेळाडू, पहिल्या लेगमध्ये २ गोल केले होते
बोरुसिया १९९६-८७ नंतर कधीही चॅम्पियन बनला नाही. आता संघाच्या यशात युवा खेळाडू अर्लिंग ब्रॉट हॉलंडचे महत्त्वाचे योगदान दिले. त्याने पहिल्या लेगमध्ये २ गोल व दुसऱ्या लेगमध्ये २ गोल केले. हॉलंडने ३५ व्या व ५४ व्या मि. पेनल्टीवर गोल व सेविलाकडून युसूफ अल नेसरीने ६८ व्या मि. पेनल्टीवर व ९०+६ व्या मिनिटाला गोल केला.

बातम्या आणखी आहेत...