आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाेन वेळचा विश्वविजेता अर्जेंटिना आणि गत उपविजेता क्राेएशिया संघ फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यादरम्यान समाेरासमाेर असतील. मंगळवारी मध्यरात्री ८८ हजार ९६६ आसन क्षमता असलेल्या लुसैल स्टेडियमवर हा पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. मिडफील्ड मजबूत असलेल्या संघालाच स्पर्धेतील आव्हान कायम ठेवताना आगेकूच करण्याची संधी आहे. या दाेन्ही बलाढ्य संघांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये गत सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. यासह या दाेन्ही संघांनी फायनलसाठीची आपली क्षमताही सिद्ध केली आहे. आता लुसैल स्टेडियमवर क्राेएशिया संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण, या संघाने दाेन सामने पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकले आहेत. यामध्ये खासकरून क्राेएशिया संघाचा पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील टीमविरुद्धचा पेनल्टी शूटआऊटमधील विजय अधिकच लक्षवेधी ठरला. या मैदानावर क्राेएशिया संघ यंदाचा आपला पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे मेसीच्या अर्जेंटिना संघाला विजयासाठी माेठी कसरत करावी लागणार आहे.
दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल अनादी बरुआ माजी खेळाडू व प्रशिक्षक अभिक चटर्जी ओडिशा एफसीचे जीएम
सुरुवातीच्या २५ मिनिटांतील खेळी ठरणार निर्णायक क्राेएशिया आणि अर्जेंटिना यांच्यात अटीतटीचा उपांत्य सामना रंगण्याची शक्यता फुटबाॅल तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सध्या हे दाेन्ही संघ विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे ही लढत तुल्यबळ संघांत मानली जाते. कारण, अर्जेंटिना संघाच्या विजयाची मदार फाॅर्मात असलेल्या लियाेनेल मेसी, डि’ मारिया, मार्टिनेज यांच्यावर आहे. हे तिघेही सध्या लक्षवेधी खेळी करत आहेत. दुसरीकडे क्राेएशिया संघाचा कर्णधार लुका माेड्रिच सध्या सर्वाेत्तम खेळी करत आहे. याशिवाय त्याने कुशल नेतृत्वातून संघाचा उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला. क्राेएशिया संघाचा जाेसेस स्टेनजिक सध्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे त्याचा सामन्यातील सहभाग अनिश्चित मानला जात आहे.
दाेन्ही संघांच्या विजयाचा दावा फिफ्टी-फिफ्टी फिफाच्या विश्वचषकात अर्जंेटिना व क्राेएशिया संघांत तिसरा सामना हाेत आहे. यापूर्वी दाेन सामन्यांत दाेन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय संपादन केला. अर्जेंटिनाने १९९८ मध्ये क्राेएशियावर १-० ने मात केल. या पराभवाची परतफेड करताना २०१८ मध्ये क्राेएशियाने ३-० ने अर्जेंटिनाला धूळ चारली हाेती. आता या दाेन्ही संघांच्या तिसऱ्या सामन्यात विजयाचा दावा प्रत्येकी ५० % मानला जात आहे.
प्लेअर टू वॉच लियोनेल मेसी ब्राेजोविक
अर्जेंटिना | मेसीचा हा शेवटचा विश्वचषक मानला जात आहे. त्यामुळे विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात घालून ताे अलविदा करण्याच्या तयारीत आहे.
क्रोएशिया| ३० वर्षीय मिडफील्डर ब्राेेजाेविक सध्या मॅच विनरच्या भूमिकेत आहे. आता त्याच्यासमाेर मेसीला राेखण्याचे माेठे आव्हान असेल.
स्ट्रॅटेजी कॉर्नर | {अर्जेंटिनाचे पाचपैकी ४ सामन्यांत विजय. एका सामन्यात पराभव झाला. टीम ४-३-३ फाॅर्मेशनने खेळणार आहे. {क्रोएशियाचे गतपाच पैकी ३ सामन्यांत विजय, २ ड्राॅ. आता हा संघ ४-३-३ फाॅर्मेशनने मैदानावर उतरणार आहे.
कोच vs कोच अर्जेंटिना | अकुना व मॉन्टियल यांचा यलाे कार्डमुळे सहभाग नसेल. स्कालाेनी यांना मजबूत डावपेच आखावे लागतील.
क्रोएशिया| क्रोएशिया संघाचे प्रशिक्षक कोच ज्लाटको यांनी मेसी व मार्टिनेजला राेखणारे डावपेच आखण्याचे संकेत दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.