आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Changes In ODI Cricket Organized By IPL, 350+ Runs 91 Times In ODIs From 2008 To Date; This Is Only 26 Times In The Previous 37 Years

दिव्य मराठी रिसर्च:आयपीएलच्या आयोजनाने वनडे क्रिकेटमध्ये बदल, वनडेत 2008 ते आजतागायत 91 वेळा 350+ धावा

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा १५ व्या सत्राच्या आयपीएलच्या व्ह्यूअरशिपमध्ये आतापर्यंतच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घसरण झाल्याचे समोर आले. मात्र, २००८ पासून सुरू झालेल्या या जागतिक दर्जाच्या टी-२० लीगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवून आणला. या झटपट क्रिकेटच्या फाॅरमॅटने खेळाडूंमध्ये प्रचंड आक्रमकता वाढली. यातून वनडेसह कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने मोठा बदल झाला. अायसीसीच्या वतीने गत चार वर्षांत ९२५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचे आयोजन करण्यात आले. यात २००५ ते २०१८ पर्यंतच्या ६३६ सामन्यांचा समावेश आहे. पहिला टी-२० सामना २००५ मध्ये खेळवण्यात आला. यामुळे वनडेत मोठ्या स्‍कोअरची नोंद झपाट्याने वाढली. त्यामुळेच २००८ ते आजतागायत ९१ वेळा ३५०+ स्‍कोअरची नोंद झाली.

वनडे क्रिकेट
२००७ पासून १५ वेळा ४००+ स्‍कोअर, त्यापूर्वी फक्त ५ वेळा
१९७१ ते २००७ पर्यंत ५ वेळा ४००+ स्‍कोअर नोंद झाला. त्यानंतर २६ वेळा ३५०+ धावांची नोंद झाली. ४२ वेळा लक्ष्याचा पाठलाग करताना ३०० + धावसंख्या झाली. सर्वाेच्च स्‍कोअर 443/9, (श्रीलंका vs हाॅलंड)।

२००८ नंतर १५ वेळा ४००+ स्‍कोअर झाला. ९१ वेळा ३५०+ धावा निघाल्या. १२३ वेळा प्रत्युत्तरात ३००+ व ७६ वेळा ३०० धावांचे लक्ष्य साध्य झाले. सर्वाेच्च स्‍कोअर 481/6, (इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया)।

द. आफ्रिकेच्या नावे सर्वाधिक वेळा ४००+ रन
संघ 400+ धावसंख्या

द. आफ्रिका 6
भारत 5
इंग्लंड 4
ऑस्ट्रेलिया 2
न्यूझीलंड 1
श्रीलंका 1

कसोटी क्रिकेट
आयपीएलमुळे स्पेशालिस्ट फलंदाजांचा शाेध अपयशी

२००८ नंतर कसोटीत ४५ खेळाडूंनी पदार्पण केले. यामधील काही मोजक्याच खेळाडूंना भारतीय संघातील स्थान कायम करता आले. इतर सर्वजण सपशेल अपयशी ठरले. काेहलीने नेतृत्व सोडल्यानंतर संघाकडे कर्णधाराचा कायमस्वरूपी पर्याय नव्हता. काही दिवसांपूर्वी कसोटीसाठी संघात स्थान मिळवणाऱ्या राेहितकडे नेतृत्व दिले तरीही संघात स्पेशालिस्ट फलंदाजाचा अभाव असल्याचे क्रिकेटतज्ज्ञांचे मत आहे. हा शाेध अद्यापही अपयशी आहे.

टेस्ट : १४ वर्षांत सर्वात कमी पदार्पण
वेगवान गाेलंदाज अधिक आक्रमक; १४०+ चेंडू टाकणारे सर्वाधिक

आपल्या वेगात चेंडू टाकण्याच्या शैलीतून अनेक युवा वेगवान गाेलंदाजांनी आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटच्या विश्वात ठसा उमटवला. त्यामुळेच १४०+ च्या वेगाने चेंडू टाकणाऱ्या गाेलंदाजांना भारतीय संघातील आपले स्थानही निश्चित करता आले. या गाेलंदाजांचा आक्रमकपणा वाढत आहे. त्यामुळेच भारतीय संघाकडे वेगवान गाेलंदाजांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

टी- 20 आंतरराष्ट्रीय
१४ वर्षांत १५५ वेळा २००+ स्कोअर, २३ वेळा प्रत्युत्तरात विजय

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २००५ ते २००७ पर्यंत १० वेळा २०० पेक्षा अधिक धावांची नोंद झाली. यात एक वेळा २००+ चे लक्ष्यही यशस्वीपणे गाठण्यात आले. २००८ ते आजपर्यंत १५५ वेळा २००+ स्‍कोअर नोंद झाला. २३ वेळा प्रत्युत्तरात संघांनी विजय मिळवला.

आयपीएलमुळे निवृत्तीच्या वयात झाली मोठी वाढ
आयपीएलमुळे जागतिक स्तरावरील क्रिकेट आणि मैदानावर मोठा बदल झाला. याशिवाय खेळाडूंच्या विचारात मोठा बदल घडून अाला. यातून भारतीय खेळाडूंच्या निवृत्तीच्या वयात मोठी वाढ झाली. यातून ही निवृत्ती वयाची सरासरी आता ३६ वर्षे असल्याचे समोर आले. २००८ नंतर ३५ वर्षीय २१ आणि ३५ वर्षांखालील ११ खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. २००८ पूर्वी निवृत्ती जाहीर करणाऱ्या खेळाडूंच्या वयाची सरासरी ३३ वर्ष हाेते. धाेनीने वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...